शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

कोल्हापूरचा दसरा महोत्सव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी प्रयत्न, यंदा प्रथमच जिल्हा प्रशासनाचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2022 12:07 PM

दरवर्षीच्या राजेशाही दसरा महोत्सवामध्ये बदल न करता त्यात लोकसहभाग वाढविण्याचा शासन प्रयत्न करेल.

कोल्हापूर : यावर्षी भव्य स्वरूपात साजऱ्या होणाऱ्या कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवातून राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या सामाजिक समतेच्या संदेशाचा प्रसार व्हावा, अशी अपेक्षा श्री शाहू महाराज छत्रपती यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलताना व्यक्त केली.शाही दसरा महोत्सवाच्या आयोजनाबाबत न्यू पॅलेस येथे रविवारी झालेल्या बैठकीस माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, दसरा महोत्सव समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.प्रशासनाच्या सहयोगाने यावर्षी होणाऱ्या शाही दसरा महोत्सवात विविध घटकांतील नागरिक सहभागी होतील यासाठी नियोजन करावे आणि या महोत्सवाला शाहूकालीन महोत्सवाचे स्वरूप प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री शाहू महाराज छत्रपती यांनी केले, तर या महोत्सवात शाहूकालीन विविध मर्दानी खेळ, कलांचे सादरीकरण व्हावे, अशी अपेक्षा संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले. कोल्हापूरचा दसरा महोत्सव भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याबाबत मालोजीराजे छत्रपती यांनी प्रशासनाचे कौतुक केले.

दीपक केसरकर म्हणाले, घोडे, उंट, मर्दानी खेळ, पोवाडा, कुस्ती प्रात्यक्षिके, पारंपरिक वेशभूषा अशा शाही लवाजम्यासह राजेशाही थाटात कोल्हापूरचा दसरा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. दरवर्षीच्या राजेशाही दसरा महोत्सवामध्ये बदल न करता त्यात लोकसहभाग वाढविण्याचा शासन प्रयत्न करेल. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दसरा महोत्सवाच्या तयारीची माहिती दिली.

या महोत्सवात महिला बचत गटांचा, विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याचे महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले. या महोत्सवासाठी नागरिकांचा प्रतिसाद पाहता, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDasaraदसरा