कोल्हापूर : शाहू छत्रपती हे सर्वांचे आहेत. कोल्हापूरसाठी आदर्श आहेत. त्यामुळे त्यांनी राजकारणापासून अलिप्त रहावे अशी आमची इच्छा होती. पण आता तेच राजकारणात येत आहेत यापुढे लोक ठरवतील अशी प्रतिक्रिया पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिली. लोकसभेच्या रिंगणातील महायुतीचे दोन्ही उमेदवार निवडून यावेत यासाठी आम्ही हाडाची काड आणि रक्ताचे पाणी करू असेही ते म्हणाले. शाहू छत्रपती लोकसभा लढवण्याच्या चर्चांवर मंत्री मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हे लोकशाहीचे राज्य आहे शाहू छत्रपतींनी राजकारणात यावे की न यावे ही सर्वस्वी त्यांची इच्छा आहे. पण ते सर्वांचेच असल्याने त्यांनी राजकारण येऊ नये अशी आमची अपेक्षा होती. 2009 चे पुनरावृत्ती होणार का, मंडलिक विरुद्ध राजघराणे अशी लढत पुन्हा होणार आहे यावर मुश्रीफ म्हणाले, हा सर्वस्वी लोकांचा निर्णय आहे ते ठरवतील.शिंदे गटाच्या जागा तशाच मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली त्यावेळी शिंदे यांच्या गटातील जागा तशाच ठेवाव्यात अशी चर्चा झाली होती. महायुतीतील तिन्ही पक्ष मिळून जे उमेदवार ठरवतील त्यांना निवडून आणू.
गुळगुळीत रस्ते बनवूकोल्हापुरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हाडांची दवाखाने सुरू करा अशी टीका केली आहे यावर मुश्रीफ म्हणाले, शंभर कोटीच्या रस्त्यांची कामे सध्या सुरू आहेत, आणखी शंभर कोटीची शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. आयआरबीच्या माध्यमातून 50 कोटींची रस्ते याआधीच झाले आहेत. त्यामुळे हाडांच्या दवाखान्याची गरज नाही आम्ही रस्तेच चांगले गुळगुळीत करू. सुळकूडबाबत आज बैठकमंत्री मुश्रीफ म्हणाले, इचलकरंजीवासियांना शुद्ध, स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे अशी शासनाची आणि पालकमंत्री म्हणून माझीही इच्छा आहे. आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीसाठी सर्व नेत्यांना तसेच योजनेला विरोध करणाऱ्या व योजनेच्या बाजूने असलेल्या समितींना बोलवण्यात आले आहे. या बैठकीतच निर्णय होईल.कोल्हापुरी चप्पलाची बनावटगिरी रोखता येणारआज पर्यंत कोणतीही चप्पल कोल्हापुरी चप्पल म्हणून विकली जात होती पण आता चपलांमध्ये क्यूआर कोड बसवल्याने ही बनावटगिरी रोखता येणार आहे. अस्सल कोल्हापुरी चप्पल परदेशांमध्ये निर्यात केली जाईल.