सातारा : आंतरराष्ट्रीय संस्थेने प्रमाणित केलेली एकमेव ‘हिल मॅरेथॉन’ म्हणून लौकिक मिळविलेल्या सातारा हिल मॅरेथॉनमध्ये यंदा दि. ६ सप्टेंबर रोजी आठहून अधिक देशांचे रनर्स धावणार आहेत. हिल मॅरेथॉनच्या चौथ्या एडिशनची घोषणा बुधवारी रेस डिरेक्टर डॉ. संदीप काटे, अध्यक्ष चंद्रशेखर घोरपडे व अॅड. कमलेश पिसाळ आदींनी साताऱ्यात केली. याबाबतची अधिकृत घोषणा होताच जगभरातील धावपटूंनी यासाठी आपण उत्सुक असल्याच्या प्रतिक्रिया अवघ्या काही क्षणातच नोंदवायला सुरुवात केली.सातारा हिल मॅरेथॉनच्या चौथ्या एडिशनची घोषणा करताना डॉ. चंद्रशेखर घोरपडे व डॉ. संदीप काटे म्हणाले, ‘सातारकरांचा मानबिंदू ठरलेल्या या इव्हेंटला ‘खेळा आनंदासाठी’ असे ब्रीद असणाऱ्या पीएनबी मेटालाईफ यांचे प्रथमच सहकार्य लाभले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून चौथ्या एडिशनची तयारी सुरू असून, ती अंतिम टप्प्यात आली. भारतातील किंबहुना जगातील ही एकमेव हिल (डोंगरी) प्रकारची असल्यामुळे रनर्सची लाडकी म्हणून मान्यता पावली आहे. यावेळी डीएसके ग्रुप आणि गोविंद मिल्क यांच्या सहप्रायोजकत्वाने सातारकरांना हातभार लागला आहे, असेही डॉ. घोरपडे म्हणाले. (प्रतिनिधी)सातारकरांसाठी विशेष कॅम्पचे आयोजनआंतरराष्ट्रीय धावपटूंबरोबरच सातारा शहर परिसरातील अनेक नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. अनेकांना त्यांचे पूर्ण ज्ञान असत नाही. त्यासाठी येत्या रविवारी १४ रोजी सकाळी ९ वाजता वायसी कॉलेजमध्ये तज्ज्ञांचा विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. तर सातारकरांसाठी नोंदणी दिनांक येत्या १५ पर्यंत वाढविण्यात आल्याची विशेष सोय करण्यात आली आहे.
‘हिल मॅरेथॉन’मध्ये धावणार आठ देशांचे धावपटू
By admin | Published: June 11, 2015 10:34 PM