शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
12
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
13
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
14
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
15
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
16
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
17
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
18
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
19
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
20
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या

शनिवारी रात्रीपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:25 AM

कोल्हापूर : जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शनिवारी (दि. १५) मध्यरात्री १२ वाजल्यापासून रविवारी (दि. २३) पर्यंत आठ दिवसांचा ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शनिवारी (दि. १५) मध्यरात्री १२ वाजल्यापासून रविवारी (दि. २३) पर्यंत आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. बुधवारी जिल्ह्यातील तीनही मंत्री, खासदार, आमदार व जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊनअंतर्गत केवळ दूध वितरण व औषध दुकानेच सुरू राहतील. आज, गुरुवारी नियमावली प्रसिद्ध केली जाईल.

जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून कोरोनाची दुसरी लाट सुरू असून यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देशात सर्वाधिक ३.४५ टक्के आहे. रोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सरासरी हजाराहून जास्त आहे. रेमडेसिविरसारख्या औषधांचा व ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संभाजीराजे, धैर्यशील माने यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे व जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी प्रत्यक्ष सहभागी झाले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, बाधितांची संख्या कमी करण्यासाठी साखळी तोडावी लागेल आणि त्यासाठी जिल्ह्यात आठ ते दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन करावा लागेल.

पालकमंत्री पाटील म्हणाले, आपण तिसऱ्या लाटेविरुद्धही तयारी करीत आहोत. शेवटच्या क्षणाला रुग्ण उपचारासाठी येत असल्याने मृत्युदर वाढत असून टास्क फोर्सच्या माध्यमातून त्यावर मार्ग काढला जाईल. आरटीपीसीआर चाचणीची क्षमताही वाढवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नवीन ऑक्सिजन प्रकल्प ५० दिवसांत पूर्ण होतील. रविवारपासून होणाऱ्या लॉकडाऊनच्या काळातील भाजीपाल्याबाबत नियोजन करावे. पोलिसांनी निर्णयांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.

आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले, लोकांच्या सुरक्षिततेसाठी कडक लॉकडाऊनचा निर्णय घेत आहोत. खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मुंबई पॅटर्न यशस्वी कसा झाला, पुण्यामध्ये चांगले यश मिळाले, त्याचे अनुकरण जिल्ह्यामध्ये करायला हवे.

आमदार प्रकाश आवाडे यांनी लसीकरण केंद्र तसेच आयजीएममध्ये सुविधा वाढवण्याची सूचना केली. अरुण लाड यांनी रुग्णालयांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी ऑक्सिजनचे प्रकल्प उभे करावेत, राजेश पाटील यांनी दुर्गम भागातील नियोजित ऑक्सिजन प्रकल्प लवकर सुरू व्हावेत व चंद्रकांत जाधव यांनी एचआरसीटी १५ च्या पुढे असणाऱ्या रुग्णांची नावे शासनाला कळवून रेमडेसिविरची मागणी करावी असे सांगितले.

खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, जयंत आसगावकर यांनीही मत मांडले.

जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या नियंत्रित राहून व्यवस्थेवर पुरविण्यास ताण येणार नाही. ४०० जम्बो सिलिंडरचा पीएसए प्लँट बसवून आयजीएम आणि सीपीआर स्वयंपूर्ण करीत आहोत. जिल्ह्यातील अतिरिक्त एक हजार ७०० ते एक हजार ८०० जम्बो सिलिंडरची क्षमता वाढणार आहे.

महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी तिसऱ्या लाटेत लहान मुलांना बाधा होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी शहरातील बालरोगतज्ज्ञ संघटनेशी चर्चा करण्यात आल्याचे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी ग्रामीण भागासाठी वॉर रूम स्थापन करून तालुक्यांसाठी संपर्क अधिकारी नेमण्यात आल्याचे सांगितले.

रेमडेसिविरचा कोटा दुप्पट

अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चेनंतर जिल्ह्यासाठी रेमडेसिविरचा कोटा दुप्पट, तर १० टन वाढीव ऑक्सिजनचा पुरवठा होणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

का हवे कडकडीत लॉकडाऊन?

अ.क्र. पहिली लाट : दुसरी लाट

१ कालावधी : १ ते ७ सप्टेंबर २०२० : ३ ते ११ मे २०२१

२ दैनंदिन रुग्णसंख्या : ७९४ : १ हजार ११७५

३ दैनंदिन अतिगंभीर रुग्णसंख्या : ३२० : ३६९

४ दैनंदिन रेमडेसिविर वापर : १ हजार कुपी : २५० कुपी

५ ऑक्सिजनचा वापर : २८ टन : ५२ टन

६ दैनंदिन मृत्यूंची संख्या (सरासरी) : २६ : ५०

७ एकूण ऑक्सिजन बेड : २ हजार ३९६ : २ हजार ९७९

८ एकूण आयसीयू बेड : ३५० : ६२३

९ एकूण व्हेंटिलेटर बेड : १४० : २८९

---

जिल्ह्यातील रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या बेडच्या माहितीसाठी नागरिकांनी http://kolhapurcovid.com/ डॅशबोर्डवर तसेच ९३५६७१६५६३, /९३५६७३२७२८/ ९३५६७१३३३० या व्हॉट्सॲप क्रमांकांवर संपर्क साधावा. फ्रंटलाईन वर्कर्सनी याची नागरिकांना माहिती द्यावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

---

फोटो नं १२०५२०२१-कोल-लॉकडाऊन बैठक

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेल्या बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी दूरदृष्यप्रणालीवरून लॉकडाऊनसंबंधी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह अधिकारी उपस्थित हाेते.

--