शहरं
Join us  
Trending Stories
1
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
2
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
3
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
5
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
6
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
7
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
8
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
9
अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले
10
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
11
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
12
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
13
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
14
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
15
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...
16
अखेर विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट जाहीर! २०२५ मध्ये या खास दिवशी रिलीज होणार सिनेमा
17
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
18
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
19
Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता
20
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी

मटका चालक विजय पाटीलसह आठजण हद्दपार

By admin | Published: July 04, 2017 1:20 AM

मटका चालक विजय पाटीलसह आठजण हद्दपार

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मटका चालक विजय पाटीलसह आठजणांना पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले, तर तेरा व्यावसायिकांकडून पन्नास हजार रुपयांचे वैयक्तिक प्रतिज्ञापत्र लिहून घेत त्यांना सुधारण्याची संधी दिली. या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. जिल्ह्यातून मटका व अवैध व्यवसाय हद्दपार करण्यासाठी पोलीस प्रशासनाने अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचा बडगा उगारला आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक निशिकांत भुजबळ यांनी मटका चालक विजय पाटीलसह २१ जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे पाठविले होते.यास मंजुरी मिळाल्याने पोलिसांनी संबंधितांच्या घरावर हद्दपारीच्या नोटिसा लावल्या होत्या. सोमवारी या सर्वांना जिल्ह्णातून हद्दपार केले. वारंवार या सर्वांच्यावर कारवाई करूनही त्यांच्यात सुधारणा होत नसल्याने ही कठोर कारवाई करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक मोहिते यांनी सांगितले. यांना दिली संधी अवैध व्यवसायात प्रथमच सहभागी असलेल्या तेराजणांना सुधारण्याची संधी पोलिसांनी दिली आहे. त्यांच्याकडून पन्नास हजार रुपयांच्या हमी प्रतिज्ञापत्रावर लेखी लिहून घेतले आहे. त्यामध्ये समीर सुरेश नायर (५१, रा. न्यू शाहूपुरी), प्रकाश गणपती शिंदे (५०, मंगळवार पेठ), योगेश आनंदराव पावले (३६, रा. कळंबा रिंगरोड), अनिल आनंदा बावचकर (३५, रा. गोगवे, ता. शाहूवाडी), कपिल दीपक जगताप (३६, कोल्हापूर), सतीश जयवंत माने (३०, रा. फुलेवाडी), रणजित रामचंद्र मोहिते (४२, रा. राजोपाध्येनगर), संतोष सुरेश देवणे (२७, रा. मंगळवार पेठ), उदय राधाकृष्ण बागल (४३, फुलेवाडी), अजिंक्य बाबूराव चव्हाण (२९, संभाजीनगर), सर्वेश मनोहर यादव (२९, रा. जवाहरनगर), अर्शद इम्तियाज मोमीन (२९, बिंदू चौक परिसर), फिरोज खलील मुजावर (४९ रा. यादवनगर) यांचा समावेश आहे.