शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

नगरसेविकेच्या पतीसह आठजणांवर गुन्हा

By admin | Published: February 15, 2015 12:59 AM

खासगी सावकारी प्रकरण : व्याजासाठी ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

कोल्हापूर : खासगी सावकारीतून कर्ज घेतलेल्या व्यक्तीस व्याजासाठी तगादा लावून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विद्यमान नगरसेविका माधुरी नकाते यांचे पती किरण नकाते यांच्यासह आठजणांवर शनिवारी जुना राजवाडा पोलिसांनी खासगी सावकारीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच नकातेंसह सर्व आरोपी पसार झाले. किरण नकाते (रा. गुजरी), सुभाष मोहिते (रा. साळोखे पार्क), रूपेश सूर्यवंशी, विठ्ठल सूर्यवंशी, अतुल चव्हाण (सर्व रा. घिसाड गल्ली), दिग्विजय पवार (रा. ताराबाई पार्क), अभिजित महाडिक (मंगळवार पेठ), प्रकाश (पूर्ण नाव समजले नाही, रा. शाहू मिलजवळ) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले, अमित रणजित शहा (वय ३४, रा. कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी) यांचे भवानी मंडप परिसरात शेतकरी सहकारी सेवा औषध दुकान आहे. या व्यवसायात ते आर्थिक अडचणीत आले होते. तसेच घरगुती व वडिलांच्या आजारपणामुळे त्यांना पैशाची गरज होती. त्यांनी आॅक्टोबर २०१३ ते आॅक्टोबर २०१४ पर्यंत वेळोवेळी आपल्या दुकानामध्ये संशयित किरण नकाते यांच्यासह त्यांच्या साथीदारांकडून २० लाख ७८ हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यापैकी १७ लाख ९ हजार रुपये व्याजापोटी त्यांना परत केले असताना नकाते यांच्यासह अन्य साथीदारांनी शहा यांच्याकडे दिलेल्या रकमेवर दरमहा ४ ते ४० टक्क्यांपर्यंत व्याज आकारुन आणखीन जादा रक्कम ३० लाख ६९ हजार रुपये देण्यासाठी तगादा लावला होता. ही रक्कम वसूल करण्यासाठी ते वारंवार दुकानात येऊन तसेच फोनवरून पत्नी व मुलासह अपहरण करून ठार मारण्याची धमकी देत होते. या त्रासाला कंटाळून शहा हे आत्महत्या करण्यासाठी घरातून निघून गेले होते. पुन्हा विचार बदलून त्यांनी शनिवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांची भेट घेतली. यावेळी खासगी सावकारीतून आपली पिळवणूक होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार मोहिते यांनी त्यांना आरोपींच्या विरोधात फिर्याद देण्यास सांगितले. त्यानुसार शहा यांनी नकाते यांच्यासह अन्य संशयितांच्या विरोधात फिर्याद दिली. मुंबई सावकार कलम ५, ३३, ३४, ३९, ४५ सह भा.दं.वि.स. कलम ५०६, ३२३ व ३४ नुसार खासगी सावकारी व ठार मारण्याची धमकी असा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच संशयित नकाते यांच्यासह अन्य आरोपी मोबाईल बंद करून पसार झाले.