कोल्हापूर : शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये आठ टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आला. या मोहिमेचा एकतिसावा रविवार असून, यावेळी शहरातील ज्येष्ठ नागरिक, विविध सामाजिक संस्था, विवेकानंद कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, कोटीतीर्थ स्वामी समर्थ मंदिर येथील कर्मचारी, नागरिक व महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम झाली.यावेळी नगरसेविका स्वाती यवलुजे, सागर यवलुजे, स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगांवकर, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, आरोग्यधिकारी डॉ. दिलीप पाटील, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, कनिष्ठ अभियंता आर. के. पाटील, प्राथमिक शिक्षण विभागाचे बाबा साळोखे, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर उपस्थित होते.हा परिसर झाला स्वच्छकळंबा फिल्टर हाऊस ते मध्यवर्ती कारागृह, इंदिरा सागर हॉटेल मेनरोड, कोटीतीर्थ तलाव, जयंती पंपिंग स्टेशन संप आणि पंप हाऊस, रिलायन्स मॉल संपूर्ण परिसर, पोलीस लाईन संपूर्ण परिसर, आष्टेकर नगर लाईन बाजार, यशवंतराव चव्हाण के.एम.सी कॉलेज, पंचगंगा नदी घाट त्याच बरोबर दसरा चौक ते खानविलकर पंप, रंकाळा टॉवर ते फुलेवाडी फायर स्टेशन, शाहू नाका ते उड्डान पूल टेंबलाई नाका ते कावळा नाका मुख्य रस्तामहापालिकेची यंत्रणा
- तीन जेसीबी
- सहा डंपर
- सहा आरसी गाड्या
- महापालिकेचे १५0 स्वच्छता कर्मचारी