राम मगदूम
गडहिंग्लज : गेल्या तीन महिन्यांत गडहिंग्लज विभागातील गडहिंग्लज, चंदगड व आजरा तालुक्यांत मिळून एकूण ५७६३० नागरिकांची कोविड तपासणी झाली. त्यात आढळलेल्या ८०४० पैकी ६८२९ रुग्ण पूर्ण बरे झाले. दुर्देैवाने २५३ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या ९४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. म्हणजेच गडहिंग्लज विभागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.९४ टक्के इतके आहे, तर मृत्युदर अवघा ३.१५ पंधरा टक्के इतका आहे.
१ एप्रिल ते २५ जून २०२१ अखेर गडहिंग्लज तालुक्यातील २७,३५३ जणांच्या तपासणीत ३७४४ रुग्ण आढळले. त्यापैकी ३२६१ बरे झाले, तर १२२ रुग्णांचा मृत्यू झाला.
चंदगड तालुक्यातील १४,५१८ जणांच्या तपासणीत १७९४ रुग्ण आढळले. त्यापैकी १४६५ बरे झाले, तर ५९ रुग्णांचा मृत्यू झाला.
आजरा तालुक्यातील १५,७५९ जणांच्या तपासणीत २५०२ रुग्ण आढळले. त्यापैकी २,१०३ बरे झाले, तर ७२ रुग्णांचा मृत्यू झाला.
गडहिंग्लज शहरातील ६०७० जणांच्या तपासणीत ८९३ रुग्ण आढळले. त्यापैकी ७९२ बरे झाले, तर २२ रुग्णांचा मृत्यू झाला.
चंदगड शहरातील १७८७ जणांच्या तपासणीत २६३ रुग्ण आढळले. त्यापैकी २४० बरे झाले, तर ९ जणांचा मृत्यू झाला.
आजरा शहरातील २४५५ जणांच्या तपासणीत ३१४ रुग्ण आढळले. त्यापैकी २२५ बरे झाले, तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला.
सध्या गडहिंग्लज तालुक्यात ३६१, चंदगड तालुक्यात २७६, आजरा तालुक्यात ३०९ मिळून एकूण ९४६ रुग्ण उपचार घेत आहेत.
--------------
- ‘ऑक्सिजन'च्या मागणीत घट..!
गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ११६ पैकी ५७ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. ३५ रुग्णांना ऑक्सिजनची गरज नाही, तर २० रुग्ण कॉन्सेंट्रेटरवर आहेत. चंदगड ग्रामीण रुग्णालयात कॉन्सेंट्रेटरवर ९ पैकी केवळ २ रुग्ण कॉन्सेंट्रेटरवर असून ७ रुग्णांवर ऑक्सिजनशिवाय उपचार सुरू आहेत.
आजरा ग्रामीण रुग्णालयातील एकही रुग्ण ऑक्सिजनवर नाही. यावरून 'ऑक्सिजन'च्या मागणीत घट झाल्याचे स्पष्ट होते.
१ एप्रिल ते २५ जूनअखेर गडहिंग्लज विभागातील तालुक्यातील आकडेवारी अशी.
अनुक्रमे तपासणी, बाधित संख्या व बरे झालेले रुग्ण आणि मृत्यू
गडहिंग्लज : २७३५३ (३७४४-३२६१-१२२)
गडहिंग्लज शहर : ६०७० (८९३-७९२-२२)
चंदगड : १४५१८ (१७९४-१४६५-५९)
चंदगड शहर : १७८७ (२६३-२४०-०९)
आजरा : १५७५९ (२५०२-२१०३-७२)
आजरा शहर : २४५५ (३१४-२२५-०६)