शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

मँचेस्टर आघाडी बेदखल

By admin | Published: March 26, 2016 12:18 AM

सुरेश हाळवणकर : इचलकरंजी पालिका; उमेदवारी मागणी प्रस्तावाचा विचार करू

इचलकरंजी : नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन उदयास येणाऱ्या मॅँचेस्टर आघाडीची फारशी दखल घ्यावी असे वाटत नाही; मात्र, आघाडीकडून उमेदवारी वाटपाचा प्रस्ताव आल्यास त्याचा विचार करता येईल, असे मत आमदार सुरेश हाळवणकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार हाळवणकर बोलत होते. नव्याने स्थापन होणाऱ्या आघाड्यांना कोणता चेहरा आहे, असे म्हणत त्याची खिल्ली उडवून ते म्हणाले, कुणाच्या तरी महत्त्वाकांक्षेपोटी होणाऱ्या आघाड्या टिकत नाहीत. त्याचा विचार निवडणूक समोर आल्यावर केला जाईल. तरीसुद्धा तथाकथित आघाडीकडून काही उमेदवार मागणीचा प्रस्ताव आल्यास त्याचा विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.नगरपालिकेत शहर विकास आघाडीने नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे यांच्या बंडाला पाठिंबा दिला असला तरी त्यामागे आवाडे यांच्या सत्तेला धक्का देणे, असा उद्देश होता. मात्र, आम्ही काही नगरपालिकेच्या सत्तेत नाही, असे सांगून आमदार म्हणाले, शासनाकडे नगरपालिकेच्या कामासाठी काही प्रस्ताव दाखल करावयाचे असल्यास तेथे असलेल्या कॉँग्रेसच्या सभापतींची मनधरणी करावी लागते. त्यामुळेच नगरपालिकेच्या कामांना विलंब होत आहे. (प्रतिनिधी)मक्तेदार नगरसेवक : पालिकेची कामे दर्जाहीननगरपालिका हद्दीतील प्रमुख रस्त्यांची कामे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत करून घेण्याविषयी आमदार हाळवणकर म्हणाले, नगरपालिकेमध्ये अप्रत्यक्षरीत्या नगरसेवकच मक्तेदार झाले आहेत. त्यामुळे पालिकेच्या कामांचा दर्जा दुय्यम झाला आहे. म्हणून नगरपालिकेमार्फत नागरिकांना द्यावयाच्या सेवा-सुविधांचा विचार केला, तर दर्जेदार रस्ते लोकांना मिळावेत म्हणून ते शासनाच्याच सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करून घेण्यात येतील. त्याचबरोबर कृष्णा नदीची दाबनलिका बदलण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करून घेतले जाईल.