पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गोदाबाई आणि त्यांचे पती अण्णाप्पा कांबळे हे वृद्ध दाम्पत्य सोमवारी निपाणी येथे उपचारासाठी गेले होते. दुपारी गावी जाण्यासाठी ते निपाणी बसस्थानकावर आले होते. त्यावेळी एका भामट्याने त्यांना गाठले. त्यांना शासकीय योजनेतून एक लाख रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यांना कोल्हापुरात आणून रुईकर कॉलनी परिसरात उद्यानात थांबविले. कार्यालयातील साहेब तुमच्या अंगावरील सोन्याचे दागिने पाहून तुम्हाला पेन्शन देणार नाहीत, असे सांगून भामट्याने त्यांचे सोन्याचे गंठण आणि कर्णफुले काढण्यास सांगितले. त्यानंतर त्याने ते दागिने घेऊन साहेबांना भेटून येतो, असे सांगून पोबारा केला. बराच वेळ भामट्याची वाट पाहून तो परत न आल्याने कांबळे दाम्पत्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे गोदाबाई कांबळे यांनी अज्ञात भामट्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
फोटो नं. २८१२२०२०-कोल-गोदाबाई कांबळे
ओळ : फसवणूक झालेल्या गोदाबाई कांबळे