कोल्हापूर : कर्जमाफीच्या कामामुळे राज्यातील सहकारी सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका तीन महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी घेतला. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ‘गोकुळ’ दूध संघासह दूध, पतसंस्थांसह इतर प्रकारांतील सुमारे ११०० संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या आहेत.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या कामात सहकार विभागाचे कर्मचारी गुंतल्याने पहिल्या टप्प्यात म्हणजेच २९ जानेवारी रोजी विकास संस्था व जिल्हा बॅँकांच्या निवडणुका तीन महिने लांबणीवर टाकल्या. त्यानंतर दोनच दिवसांत सर्वच संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ‘गोकुळ’सह दूध, पतसंस्थांसह इतर सर्व प्रकारांतील सुमारे ११०० संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.जिल्ह्याचे राजकारण थंडावले‘गोकुळ’, जिल्हा बॅँकेसह हजारो संस्थांच्या निवडणुका या तीन महिन्यांत होणार होत्या. यामुळे जिल्ह्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघणार होते. मात्र निवडणुकाच लांबणीवर टाकल्याने राजकारण थंडावणार आहे.
- निवडणुका लांबणीवर पडलेल्या संस्था :
गोकुळनागरी बॅँका - ३ (प्राथमिक शिक्षक बॅँक)सेवक पतसंस्था - ६औद्योगिक संस्था - २दूध संस्था - ५००पतसंस्था - १२५