कोल्हापूर : बिंदू चौक प्रभाग क्रमांक ३२ मध्ये एका परिसरात चार उमेदवार रिंगणात आहेत. परिसरातून एकच उमेदवार देऊन त्याला निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. घर टू घर जाऊन मतदान घेण्यात येत आहे. तीन दिवसांनंतर मतमोजणी केली जाणार असून, विजय उमेदवारच्या मागे इतर तीन उमेदवार राहणार आहेत.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी पत्ते खोलणे सुरू केले आहे. काही प्रभागांत १५ पेक्षा जास्त उमेदवार आहेत. बिंदू चौक प्रभाग क्रमांक ३२ मध्येही चुरशीने निवडणूक होत आहे. हा प्रभाग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. भवानी मंडप, बिंदू चौक, शिवाजी रोड येथील म्हसोबा देवालय ट्रस्ट परिसर, आझाद गल्ली, हुजूर गल्ली, आराम कॉर्नर, राजारामरोड, परीट गल्ली या परिसरात चार उमेदवार रिंगणात आहेत. येथे सुमारे २७०० मतदान आहे. येथील नागरिकांनी एकच उमेदवार देण्यासाठी पुढाकार घेतला. ज्येष्ठ नागरिकांची एक समिती स्थापन केली. त्यामध्ये उपसमिती स्थापन केली. यामध्ये ५१ जणांचा समावेश आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार मंगळवारी परिसरात ‘घर टू घर’ जाऊन मतदान घेण्यास सुरू झाले. तीन दिवसांनी मतमोजणी होणार आहे.