शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक एकतर्फी की, चुरशीची ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 12:12 AM

कोल्हापूर : महापौर-उपमहापौर कोण होणार, निवडणूक चुरशीची होणार की एकतर्फी, शिवसेनेचे चार नगरसेवक आपली मते कोणाच्या पारड्यात टाकणार, या ...

कोल्हापूर : महापौर-उपमहापौर कोण होणार, निवडणूक चुरशीची होणार की एकतर्फी, शिवसेनेचे चार नगरसेवक आपली मते कोणाच्या पारड्यात टाकणार, या प्रश्नांची उत्तरे आज, बुधवारी सायंकाळी मिळणार आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून महापौरपदाचे उमेदवार म्हणून कोणाचे नाव जाहीर होणार यावर चुरस स्पष्ट होईल; तसेच पुढील घडामोडी घडतील. त्यामुळे निवडणुकीत काय होणार, याकडे मनपा वर्तुळाचे लक्ष लागले आहे.महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक सोमवारी (दि. १०) होत असून त्याकरिता आज, बुधवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. पक्षीय बलाबल पाहता महापौर, उपमहापौर कॉँग्रेस-राष्टÑवादीचे होतील, यात शंकाच वाटत नाही; परंतु या दोन्ही पदांसाठी पक्षांतर्गत चुरस आणि संघर्ष उफाळून आला असल्यामुळे, उमेदवारी कोणाला मिळते यावरच बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. पक्षात या पदासाठी चार-चार उमेदवार इच्छुक असल्याने चुरस वाढली आहे. कोणाला तरी एकाला उमेदवारी मिळाल्यावर बाकीच्यांची समजूत कशी काढायची, हाच पक्षनेत्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी राष्टÑवादीकडे महापौरपद राहणार असून पक्षाकडून अ‍ॅड. सूरमंजिरी राजेश लाटकर, सरिता नंदकुमार मोरे, माधव प्रकाश गवंडी, अनुराधा सचिन खेडकर यांनी आग्रही दावा केला आहे. राष्टÑवादीत सहा-सहा महिने महापौर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यात लाटकर आणि मोरे आघाडीवर आहेत. पहिल्यांदा आपल्या नावाचा विचार करावा, असा दोघींचा हट्ट आहे. माधवी गवंडी यांना तीन महिन्यांकरिता का होईना, महापौर करणार असा शब्द नेत्यांनी दिल्याचीही चर्चा आहे.उपमहापौरपद यावेळी कॉँग्रेसकडे राहणार आहे. सोमवार (दि. १०) पर्यंत कॉँग्रेसकडून अशोक जाधव, भूपाल शेटे, श्रावण फडतारे यांची नावे आघाडीवर होती. या यादीत संजय मोहिते, शोभा कवाळे, वृषाली कदम यांचाही समावेश झाल्यामुळे कॉँग्रेसमध्येही संघर्ष असल्याचे स्पष्ट होत आहे. भूपाल शेटे, संजय मोहिते यांना स्थायी समिती सभापतिपद पाहिजे आहे; परंतु सोमवारी (दि. ३) आमदार सतेज पाटील यांनी मोहिते, शेटे उपमहापौरपदाचे दावेदार असल्याचे सांगून गोंधळ उडवून दिला. आमदार पाटील यांनी उपमहापौरपदाचा कार्यकाळ वर्षासाठी असेल असे सांगितल्याने या पदावर ज्येष्ठ नगरसेवकाची निवड होण्याची शक्यता दिसते. जाधव, शेटे, मोहिते यांच्यात ही चुरस राहील.भाजप-ताराराणीचे लक्ष कॉँग्रेस-राष्टÑवादीतील घडामोडींवरमहापौर-उपमहापौरपदाची निवडणूक अगदी तोंडावर आली असतानाही भाजप-ताराराणी आघाडीत फारशा हालचाली दिसत नाहीत. त्यांच्या आघाडीच्या नेत्यांचे व कारभाºयांचे सगळे लक्ष कॉँग्रेस-राष्टÑवादीतील घडामोडींवर खिळून राहिले आहे. काहीतरी अनपेक्षित घडामोडी घडतील, कॉँग्रेस-राष्टÑवादीत कलह निर्माण होईल आणि त्यातून आठ-नऊ नगरसेवक बाहेर पडतील, अशा काल्पनिक आशावादावर ही मंडळी विसंबून आहेत; परंतु त्यांचा आशावाद किती प्रबळ आहे, हे आज, बुधवारी सायंकाळी स्पष्ट होईल. दरम्यान, भाजप-ताराराणी आघाडीने नेहमीप्रमाणे आपला ‘ए प्लॅन’ तयार ठेवला आहे. त्यांच्याकडे दुसरा ‘बी प्लॅन’ही तयार आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीत बंडाळी माजलीच तर हा दुसरा ‘बी प्लॅन’च्या अंमलबजावणीकरिता यंत्रणा तयार ठेवली आहे. त्यासाठी काही असंतुष्ट नगरसेवकांशी त्यांच्या यापूर्वी चर्चाही झालेल्या आहेत. या आघाडीकडून महापौरपदासाठी सविता भालकर, उमा इंगळे यांची नावे चर्चेत आहे. कॉँग्रेस आघाडीत फाटाफूट झालीच तर ‘बी प्लॅन’च स्वीकारला जाईल. त्याप्रमाणे महापौरपदाच्या उमेदवार जयश्री जाधव या असतील. निवडणूक जिंकण्याची आशा असेल तरच जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे.सूरमंजिरी लाटकरयांची जमेची बाजूसूरमंजिरी यांचे पती राजेश हे हसन मुश्रीफ यांचे कट्टर कार्यकर्ते.स्वत: सूरमंजिरी या उच्च विद्याविभूषित असून, वकील आहेत.महापालिकेचा अभ्यास, कायद्याचे ज्ञान, संभाषण कौशल्य.सरिता मोरे यांची जमेची बाजूराष्टÑवादीकडून निवडणूक लढतानाच नेत्यांकडून पदाधिकारी करण्याचे आश्वासन.सरिता मोरे या दुसºयांदा महापालिकेत निवडून गेल्या असून, त्यांची ज्येष्ठता स्पष्ट.मोरे यांच्या बाजूने राष्टÑवादीतील सात ते आठ नगरसेवकांकडून आग्रह धरला आहे.