शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पाऊस, पुराचे कारण; सोळा साखर कारखान्यांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 4:04 PM

संचालकांना मुदतवाढ द्यायची तरी किती? अशी विचारणा सभासदांमधून होत आहे.

राजाराम लोंढेकोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात जुलै, ऑगस्टमध्ये पडणारा पाऊस, संभाव्य पूरस्थिती पाहता, विभागातील साखर कारखान्यांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर घ्याव्यात, असे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे विभागातील पात्र सोळा साखर कारखान्यांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता असून सप्टेंबरनंतरच प्रक्रिया सुरू करण्याबाबत हालचाली आहेत. हे जरी खरे असले तरी, संचालकांना मुदतवाढ द्यायची तरी किती? अशी विचारणा सभासदांमधून होत आहे.कोरोनामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका मार्च २०२० पासून लांबणीवर टाकण्यात आल्या. जवळपास दीड वर्ष कोरोनात गेल्याने ऑक्टोबर २०२१ नंतर संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. त्यानुसार प्रक्रिया सुरू झाली. दूध, विकास, पतसंस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या. याच कालावधीत जिल्हा बँक, ‘गोकुळ’ यासारख्या शिखर संस्थांच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर विभागातील सात कारखान्यांची निवडणूक प्रक्रिया पार पडली.अजून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील जवळपास १३ साखर कारखाने निवडणुकीस पात्र होते. त्यातील ‘कुंभी’, ‘आप्पासाहेब नलवडे’, ‘राजारामबापू’, ‘निनाईदेवी’ या कारखान्यांची निवडणूक प्रक्रिया प्रारूप यादी, हरकती येथेपर्यंत सुरू आहे. अद्याप पाऊस नसला तरी, जुलै, ऑगस्टमध्ये कोल्हापूर जिल्हा व सांगलीतील काही तालुक्यांत धुवाधार पाऊस असतो. पाऊस व पूरस्थिती या सगळ्या पार्श्वभूमीवर निवडणुका घेणे अवघड आहे. त्यामुळे या कारखान्यांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर घ्या, अशी मागणी काही कारखान्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

कार्यक्षेत्रातील पर्जन्यवृष्टीची माहिती प्राधिकरणाकडे

साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांतील जुलै, ऑगस्टमधील पर्जन्यवृष्टी व पुराची स्थिती काय, याबाबतची माहिती प्राधिकरणाला देण्याची तयारी काही साखर कारखान्यांनी केली आहे.

पावसाळ्यानंतर ‘बिद्री’चे रणांगणकोल्हापूर जिल्ह्यातील सात कारखाने निवडणुकीस पात्र आहेत. त्यांची निवडणूक लांबणीवर गेली, तर पावसाळ्यानंतर ‘बिद्री’ साखर कारखान्याचे रणांगण सुरू होणार आहे. या सगळ्यामुळे निवडणूक यंत्रणेवर ताण येणार हे निश्चित आहे.

हे कारखाने आहेत निवडणुकीस पात्र  कारखाना                   मुदत संपल्याचा दिनांकराजाराम, कसबा बावडा      २० एप्रिल २०२०माणगंगा, आटपाडी           २८ मे २०२०राजारामबापू, वाळवा         २९ मे २०२०निनाईदेवी, शिराळा           ५ ऑगस्ट २०२०कुंभी, कुडित्रे                  २८ डिसेंबर २०२०नलवडे, गडहिंग्लज           २९ मार्च २०२१शेतकरी, मिरज                १७ एप्रिल २०२१सह्याद्री, धामोड               १९ एप्रिल २०२१क्रांती, कुंडल                  ६ मे २०२१इंदिरा, तांबाळे                 १६ मे २०२१वसंतदादा, मिरज              २२ मे २०२१आजरा, गवसे                 २३ मे २०२१हुतात्मा, वाळवा               १६ एप्रिल २०२२भोगावती, परिते               २४ एप्रिल २०२२गायकवाड, बांबवडे           १ मे २०२२सर्वाेदय, कारंदवाडी           २१ जून २०२२

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक