शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
3
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
4
'गद्दारांना तुरुंगात टाकू'; सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
5
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
6
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
7
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
8
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
9
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
10
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
11
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
12
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
13
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
14
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
15
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
16
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
17
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
18
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
19
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

राज्यातील दोनशे बाजार समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु, 'या' दिवशी होणार मतदान

By राजाराम लोंढे | Published: September 06, 2022 6:08 PM

कोल्हापूर, गडहिंग्लज, जयसिंगूपर बाजार समित्यांसाठी २९ जानेवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे.

कोल्हापूर : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील दोनशे बाजार समित्यांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आज, मंगळवारी पुन्हा सुरु करण्याचे आदेश सहकार विभागाला दिले आहेत. त्यानुसार मतदार यादीची प्रक्रिया सुरु होणार असून २३ डिसेंबरला निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. कोल्हापूर, गडहिंग्लज, जयसिंगूपर बाजार समित्यांसाठी २९ जानेवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे.कोरोनामुळे मार्च २०२० पासून राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणूका घेता आलेल्या नव्हत्या. मध्यंतरी सहकारी संस्थांच्या निवडणूका सुरु झाल्या, त्यानुसार बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रियाही सुरु करण्यात आली. मतदार याद्या मागवण्याचे कामही सुरु झाले. मात्र एका विकास संस्थेने औरंगाबाद खठपीठात याचिका दाखल करुन विकास संस्थांच्या निवडणूका घेतल्याशिवाय समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु करु नये, अशी मागणी केली.त्यानुसार खंडपीठाने ऑगस्ट २०२२ पर्यंत स्थगिती देत विकास संस्थांच्या निवडणूका घेण्याचे आदेश दिले. विकास संस्थांच्या निवडणूका झाल्यानंतर न्यायालयाने समित्यांची प्रक्रिया सुरु करण्यास परवानगी दिली. त्यानुसार सहकारी निवडणूक प्राधिकरणाने कार्यक्रम जाहीर केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकMarketबाजार