शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
3
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
4
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
5
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
6
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
7
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
8
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
9
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
10
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
11
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
12
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
13
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
14
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
15
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
16
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
17
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
18
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
19
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'

Kolhapur News: माडवळेत हत्तीच्या कळपाचा धुमाकूळ, ऊसशेतीचे नुकसान; ग्रामस्थांमध्ये भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 12:21 PM

तो ‘टस्कर’ तळेवाडी-अर्जुनवाडीच्या जंगलात

चंदगड : माडवळे गावात पार्शी वाड्यालगत उसाच्या शेतात हत्तींच्या कळपाने बुधवारी (दि. १) रात्री दहाच्या सुमारास धुमाकूळ घातला आहे. हत्तींच्या कळपाने पांडुरंग रामा दळवी, म्हात्रू कृष्णा पार्शी यांच्या ऊसपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हा कळप पुढे हाजगोळी मार्गे कर्नाटक हद्दीत धामणे गावाकडे निघून गेल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.बुधवारी रात्री पाच हत्तींचा कळप कोदाळी, धनगरवाड्यावरून माडवळे गावाजवळील पार्शी वाड्याच्या परिसरात आला. याबाबतची माहिती मिळताच काही ग्रामस्थांनी हत्तीच्या कळपाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा कळप पुढे हाजगोळी मार्गाने कर्नाटक हद्दीत निघून गेला आहे.नारायण वैजू गावडे व वनरक्षक प्रकाश शिंदे यांनी नुकसानीचा पंचनामा केला. अथर्व-दौलत साखर कारखान्याचे शेतीगट अधिकारी यांनी नुकसान केलेल्या उसाची पाहणी केली. यावेळी नेमाणा गावडे, सुरेश पार्शी, जोतिबा गावडे, संतोष गावडे, गणपत पवार, रवळू गावडे, शिवराज दळवी, मारुती मसूरकर, गोविंद पार्शी, शेतकरी उपस्थित होते.पाटणे वनविभागाच्या हद्दीत हत्तींचा वावर कायम असून कोदाळी, धनगरवाडा, जंगमहट्टी, माडवळे, पार्शीवाडा, हाजगोळी मार्गे कर्नाटक हद्दीत असा त्यांचा मार्ग आहे. त्यामुळे दरवर्षी हा कळप या परिसरात येतो. मात्र, अशावेळी ग्रामस्थांनी त्यांना त्यांच्या मार्गे जाऊ द्यावे, जेणेकरून नुकसान कमी होईल. या कळपाला हुसकावून लावण्याच्या प्रयत्नात हा कळप अधिक बिथरतो आणि आसपासच्या शेताचे नुकसान करतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम ठेवून हत्तींना आपल्या मार्गे जाऊ द्यावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.तो ‘टस्कर’ तळेवाडी-अर्जुनवाडीच्या जंगलातनेसरी : नेसरी-तळेवाडी परिसरात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान करून धुमाकूळ घालणाऱ्या टस्कर हत्तीने तळेवाडी-अर्जुनवाडी जंगलात ठाण मांडले आहे. वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी त्याच्या मागावर असून, बुधवारी (दि. १) रात्री अर्जुनवाडीतील शेतकऱ्यांच्या ऊसपिकाचे हत्तींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.टस्करने तळेवाडीतील शशिकांत देसाई यांच्या घरासमोर लावण्यात आलेला ट्रॅक्टर, प्रकाश देसाई यांची गवत गंजी व बहिर्जी देसाई यांच्या नारळांच्या झाडांचे, काशीलिंग मंदिर परिसरातील नदीघाटावर बसविण्यात आलेल्या विद्युत मोटारी, वायरिंग, बॅरेल, नेसरी-डोणेवाडी दरम्यान घटप्रभा नदीवरील होडीसह पिकांचे नुकसान केले आहे. त्यामुळे नदीत पडलेल्या मोटारी व बॅरल काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. काही विद्युत मोटारी तर ट्रॅक्टर व जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आल्या.नदीघाट परिसरात झालेल्या नुकसानाची सरपंच गिरिजादेवी शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. आजरा वनक्षेत्रपाल स्मिता डांगे, वनपाल प्रकाश वारंग, संजय नीळकंठ, वनरक्षक सुनील भंडारे यांनी हत्तीकडून झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी उपसरपंच प्रथमेश दळवी, डोणेवाडी सरपंच सिकंदर मुल्ला, उपसरपंच रंगराव नाईक, ग्रामविकास अधिकारी पी. बी. पाटील, आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग