समीर देशपांडे ।कोल्हापूर : गेल्या १६ वर्षांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात हत्ती आणि गव्यांच्या हल्ल्यात २४ जणांचा मृत्यू झाला असून, ११३ जण जखमी झाले आहेत. या सर्वांच्या वारसांना एक कोटी १४ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. दिवसेंदिवस या घटनांमध्ये मात्र वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये वन्य प्राण्यांनी शेतीचे नुकसान करण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या १२ वर्षांमध्ये हत्तींनी शेतीचे नुकसान केलेली ४८३० प्रकरणे दाखल असून, त्यापोटी एक कोटी ५४ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे; तर गव्यांनी पिकांचे नुकसान केलेली १५,७०८ प्रकरणे दाखल असून, त्यापोटी चार कोटी ९२ लाख रुपये अदा करण्यात आले आहेत.खुल्या जंगल प्रमाणातही वाढ होत असून, गव्यांचीही संख्या वाढत असल्याचे निरीक्षण वन विभागाने नोंदविले आहे.नुकसान भरपाईचे दरनवीन शासन आदेशानुसार वनप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास वारसांना आठ लाख रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास चार लाख रुपये देण्याची व नुसते जखमी असणाऱ्यांना एक लाख रुपये देण्याची तरतूद करण्यात आलीआहे.सन गवे एकूण प्राणी२०१५ २८० ६८३२०१६ ४०७ ९८१२०१७ ५७२ १३९८(कोल्हापूर जिल्ह्यात पाच फिरते हत्ती व दोन कायमचे असे एकूण सात हत्ती आहेत.)