लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : आंबर्ड धरणामुळे परिसरातील गावाचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. महिलांची उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण थांबून येथील शेती हिरवीगार होऊन शेतकरी सुखी होईल असे प्रतिपादन शाहूवाडी-पन्हाळ्याचे आमदार डॉ. विनय कोरे यांनी व्यक्त केले.
आंबर्डपैकी रणवरेवाडी येथील धरणांची घळभरणी कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच सूर्यकांत पाटील होते.
डॉ. विनय कोरे म्हणाले, आमदारकीच्या माध्यमातून जनतेची सेवा करणार असून, मतदारसंघात विकासाची गुढी उभारली जाणार आहे.
आमदार डॉ. विनय कोरे, जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील यांच्या हस्ते धरणाची घळभरणी करण्यात आली. आंबर्ड ग्रामस्थाच्या वतीने आमदार डॉ. विनय कोरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास आमदार डॉ. विनय कोरे, माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, माजी सरपंच सूर्यकांत पाटील, गुगाप्पा लोकरे, ठेकेदार आनंदा पाटील , कार्यकारी अभियंता धनाजी पाटील, शाखा अभियंता विपुल खोत, जालिंदर कांबळे, राजेश पाटील, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
१६ आंबर्डे विनय कोरे
फोटो : आंबर्डेपैकी रणवरेवाडी येथील धरणाची घळभरणी करताना आमदार डॉ. विनय कोरे, सर्जेराव पाटील, आनंदा पाटील, आदी उपस्थित होते.