चंदगड :-- मुगळी ( ता . चंदगड ) येथील रवळनाथ सेवा संस्थेत १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१ ९ या आर्थिक वर्षात १४ लाख ३६ हजार ७ रुपयांचा अपहार झाला आहे .याबाबतची फिर्याद चंदगड येथील लेखापरिक्षक निसार शेरखान यांनी चंदगड पोलिसात दिली आहे . विद्यमान अध्यक्ष,उपााध्यक्ष, संचालक , संचलिका , बँक निरिक्षक , बँक शाखाधिकारी अशा एकूण १५ जणां विरोधात चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे .
यासंदर्भात पोलिसांतून मिळालेली माहीती अशी - मुगळी ( ता . चंदगड ) येथील रवळनाथ सेवा संस्थेतील सभासदांना बोगस मेंबर कर्ज , खावटी कर्ज , कर्जावील व्याज न घेता बंद केलेली रक्कम , सभासदांच्या ठेवीची रक्कम सभासदांच्या सह्या न घेता उचल , खर्चाचे बिल व्हौचर्स न घेता इतर खर्चावरील रकमा अशी एकूण १४ लाख ३६ हजार ७ रुपये संस्था रोजकिर्दीच्या जमा रकमेच्या हात शिल्लकेतून बँक चालू खातेस प्रत्यक्ष भरणा न करता फक्त किर्दीला पोकळ जमा खर्च केलेला आहे .
तथापि त्यांचे भरणा काँन्टर तपासणीला उपलब्ध न झाल्यामुळे बँकेचा खाते ऊतारा मागवून वेळ घेतले असता सदर बँक चालू खातेस खर्ची पडललेल्या रकमा बँक खात्यास भरणा केलेचे दिसून येत नाहीत . कर्जावरील व्याज न घेणे , सभासदांच्या नावावर बोगस कर्ज टाकून , मेंबर ठेव व खर्च व्हौचर्स नांवे टाकून संस्था हातशिल्लक घटविणेत आलेली आहे . संस्थेच्या सर्व रक्कमेचा आपल्या खासगी कारणासाठी वापर करुन संस्था सभासदांची फसवणुक केली आहे .संस्था निधीचा गैरवापर व अपहार केला आहे . १६ जुलै २०१ ९ ते १ ९ आक्टोबर २०१ ९ च्या लेखापरिक्षण तपासणीमध्ये संशयित १ ते १५ यांनी संगनमताने १४ लाख ३६ हजार ७ रुपयांचा अहपार करुन सभासदांची फसवणुक केली आहे . अध्यक्ष गणपती राणबा कलागते , उपाध्यक्ष जयवंत मल्लाप्पा पाटील , संचालक कान्होबा गोपाळ शिवनगेकर , कैतान बाळकु फर्नांडीस , मारुती धाकु शिप्पुरकर , बाबु बाळु रेडेकर , दशरथ जोतिबा मुरुडकर , यल्लापा धोडींबा कांबळे , सौ . प्रेमा मोहन रेडेकर , सौ . सुधा नारायण करगोनावर , सचिव कल्लापा राणबा कांबळे ( सर्व रा . मुगळी , ता . चंदगड ) ,जिल्हा बॅँ क शाखा अडकुरचे निरिक्षक दादु हसन मुल्ला ( रा . गडहिंग्लज ) , अडकूर शाखेचे शाखाधिकारी पुरुषोत्तम मातोंडकर ( रा . यशवंतनगर , चंदगड ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे . घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पो . हे . काँ . श्री . नांगरे तपास करत आहेत .