शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

यंत्रमागधारकांची आर्थिक कोंडी

By admin | Published: February 03, 2015 12:08 AM

मजुरीवाढ लांबल्याचा परिणाम : कापड व्यापाऱ्यांचे आडमुठे धोरण; वीज दरवाढीमुळे वस्त्रोद्योगात अस्वस्थता

राजाराम पाटील - इचलकरंजी -यंत्रमाग कामगारांच्या बरोबरीनेच खर्चीवाले (जॉबवर्क) यंत्रमागधारकांच्या मजुरीत वाढ करण्याचा निर्णय कामगार मंत्र्यांसमोर झाला असतानाही कापड व्यापारी गेले महिनाभर मजुरीवाढीची मागणी फेटाळत असल्याने शहर व परिसरातील सुमारे ४० टक्के यंत्रमागधारक आर्थिक कोंडीत सापडले आहेत. त्यातच वीज दरवाढीचा फटका बसणार असल्याने येथील वस्त्रोद्योगामध्ये अस्वस्थता पसरली आहे.शहर व परिसरात असलेल्या सुमारे ४० हजार यंत्रमागांवर बड्या कापड व्यापाऱ्यांकडून जॉबवर्क पद्धतीने सूत व बिमे देण्यात येऊन त्यापासून यंत्रमागधारकांकडून तयार कापड विणून घेतले जाते. त्यासाठी प्रतिमीटर मजुरी देण्यात येते. फेब्रुवारी २०१३ मध्ये तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर कामगारांच्या मजुरीवाढीचा प्रस्ताव निकालात काढण्यात आला. त्यावेळी कामगारांबरोबरच खर्चीवाले (जॉबवर्क) यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीचाही निर्णय दरवर्षी घेतला जाईल, असे ठरविले होते. ५२ पीक प्रतिच्या प्रतिमीटर कापडासाठी दोन रुपये ३४ पैसे अशी मजुरी देण्याची तयारी ठरली. मात्र, हा दर वस्त्रोद्योगात होणाऱ्या तेजी-मंदीबरोबर काहीअंशी बदलला जातो. त्याला प्रचलित मजुरीचा दर असे म्हणण्याचा प्रघात आहे.त्यानंतर जानेवारी २०१४ व जानेवारी २०१५ यावेळी यंत्रमाग कामगारांना अनुक्रमे ४ पैसे व ७ पैसे अशी वाढ देण्यात आली. या दोन वर्षांत कापड व्यापाऱ्यांनी खर्चीवाले यंत्रमागधारकांना मजुरीत वाढ दिलेली नाही. त्यामुळे कामगारांचा वाढलेला पगार, महागाई व वाढलेला वीज दर याचा विचार करता इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनने क्लॉथ अ‍ॅण्ड यार्न मर्चंटस् असोसिएशन या कापड व्यापाऱ्यांच्या संघटनेकडे प्रति पीक प्रतिमीटर एक पैसा मजुरीवाढ मिळावी, अशी मागणी केली. त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याने यंत्रमागधारकांच्या संघटनेने प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांना याप्रकरणी मध्यस्थी करण्याची विनंती केली.यंत्रमागधारक संघटनेच्या मागणीप्रमाणे अश्विनी जिरंगे यांनी १२ जानेवारीला बोलविलेल्या कापड व्यापारी व यंत्रमागधारक यांच्या संयुक्त बैठकीत कामगारांना वाढलेली मजुरी इतकीच यंत्रमागधारकांना मजुरी देण्याची तयारी दर्शविली.मात्र, या निर्णयाशी यंत्रमागधारक संघटना तयार नसल्याने पुन्हा बैठक घेण्याचे ठरले. १५ जानेवारीला झालेल्या बैठकीस कापड व्यापारी आले नाहीत म्हणून १९ जानेवारीला पुन्हा बैठक घेण्यात आली. या बैठकीत कापड व्यापारी संघटनेचे सदस्य अधिक मजुरी देण्यास तयार नसल्याचे व्यापारी प्रतिनिधींनी सांगितले. त्यामुळे व्यापाऱ्यांचे हेच म्हणणे लेखी देण्यात यावे, असे प्रांताधिकारी जिरंगे यांनी सुचविले; पण व्यापाऱ्यांनी लेखी म्हणणे न देता ती बैठक संपुष्टात आली.दरम्यान, आज, सोमवारी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, नारायण दुरुगडे, दत्तात्रय कनोजे, महंमदरफिक खानापुरे, सोमाण्णा वाळकुंजे, आदींनी प्रांताधिकारी जिरंगे यांची भेट घेतली. एक महिना उलटला असल्याने प्रांताधिकाऱ्यांनीच आता ही आर्थिक कोंडी फोडावी, असे त्यांना सुचविण्यात आले. त्यावर लवकरच कापड व्यापाऱ्यांना बैठकीस बोलावून निर्णय दिला जाईल, असे प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले.