सध्या परिसरामध्ये उसाचे खोडवे काढण्याचे काम नांगरणीद्वारे केले जात आहे. खरीप पेरणीपूर्व सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी धडपड चालल्याचे दिसत आहे. या भागातील बहुतेक शेतकरी ट्रॅक्टरद्वारे मशागतीची कामे उरकत असून, पारंपरिक बैलांची नांगरट लुप्त पावत चालल्याचे दिसत आहे. ऊस भरणी काम अंतिम टप्प्यात आले आहे.
मागील वर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना हंगामामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते; पण यावर्षी हवामान खात्याने यंदाच्या वर्षी पाऊस वेळेवर आणि भरपूर असल्याचे सांगितल्याने शेतकरी आपल्या शेतीमध्ये खरीपपूर्व पेरणीच्या मशागतीची कामे जोमाने करीत आहे. यावर्षी वाढलेले इंधनाचे दर यामुळे नांगरट, मशागतीचे दरही गगनाला भिडले आहेत.