संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : समाजातील एक महत्त्वाचा घटक असणाऱ्या तरुणाईच्या राजकीय पक्ष, नेते-मंडळींकडून काय अपेक्षा आहेत. ते जाणून घेऊन समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न आॅल इंडिया यूथ फेडरेशनने (एआययुएफ) ‘युवा जाहीरनामा’च्या माध्यमातून केला आहे. विविध प्रश्नांची उजळणी करून तरुणाईमधील राजकीय जाणीव वाढविण्याच्या कामावर भर देण्यात येणार आहे. कोल्हापूरनंतर आता महाराष्ट्र, दिल्ली आणि दक्षिण भारतात या जाहीरनाम्याचे लोकार्पण होणार आहे.मुद्दे हरविलेली लोकसभेची निवडणूक जनता, युवा वर्गाच्या खऱ्या मुद्यांवर आणून निवडणुकीस दिशा देणे. राजकीय वर्गाच्या जबाबदारीची त्यांना आठवण करून देणे. रोजगार, शिक्षण, पर्यावरण, आरोग्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्रीय अखंडता या मुद्यांवर निवडणूक लढविण्यास भाग पाडणे. युवा वर्ग, जनता यांना त्यांच्यात खºया मुद्यांची राजकीय जाणीव वाढविणे. त्यांना हे मुद्दे, निकष पाहूनच मतदान करण्यास तयार करणे या उद्देशाने हा जाहीरनामा तयार करण्यात आला. ‘एआययुएफ’ने तरुणाईलाआवाहन करून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.देशातील विविध विद्यार्थी, युवक संघटनांच्या आंदोलनातील मागण्या एकत्रित केल्या. त्यातून युवा जाहीरनामा साकारला आहे. कोल्हापूरमध्ये जाहीरनाम्याचे लोकार्पण झाले आहे. येत्या १० दिवसांत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत, बेगुसराय व पाटणा (बिहार),दिल्ली, केरळसह दक्षिण भारतात या युवा जाहीरनाम्याचे लोकार्पण केले जाणार आहे.विचार करण्याचा आग्रहसहा सदस्यांच्या सल्लागार समितीच्या माध्यमातून युवा जाहीरनाम्याला अंतिम रूप मिळाले. माजी न्यायाधीश पी. बी. सावंत यांनी प्रस्तावना लिहिली असल्याचे युवा जाहीरनामा समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी सांगितले.ते म्हणाले, हा जाहीरनामा केवळ निवडणुकीच्या कालावधीपुरता नाही. सत्तेवर येणाºया राजकीय पक्षांवर दबाव वाढवून मागण्या मान्य करून घेतल्या जाणार आहेत. मानवतेची जपणूक द्वेषाच्या राजकारणातून होणार नाही.खºया विकासात एका-एका व्यक्तीचा विचार केला जावा; यासाठी जाहीरनामा हा आमचाआग्रह आहे.या संघटनांची साथ‘एनएसयूआय’, स्वाभिमानी युवक संघटना, आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, युनिव्हर्सिटी स्टुडंट्स असोसिएशन, आप युवा आघाडी, पुरोगामी युवक संघटना, स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडिया, संभाजी ब्रिगेड या संघटनांनी युवा जाहीरनाम्याबाबत ‘एआययुएफ’ला साथ दिली आहे.
तरुणाईतील राजकीय जाणिवांवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 12:39 AM