कोल्हापूर : येथील विमानतळावर भूमिपूत्रांना रोजगार द्यावा, अन्यथा विमानतळावर प्रवाशांना रोखू अशा इशाऱ्याचे निवेदन शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाशी चर्चा करताना जिल्हाधिकारी देसाई यांनी या प्रश्नावर विमानतळ प्राधिकरण आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.सध्या विमानतळ विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. यामध्ये मुडशिंगी, उचगाव, सरनोबतवाडी, नेर्ली, तामगाव, गोकूळ शिरगाव गावातील शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे. याशिवाय ग्रामपंचायतच्या ताब्यातील ७५० एकर क्षेत्र विस्तारीकरणासाठी संपादित करण्यात येणार आहे. या गावातील स्थानिकांना आणि जमीन गेलेल्या कुटुंबातील सदस्यांना विमानतळावर नोकरी, रोजगार मिळावा.विमानतळ विस्तारीकरणासाठी घेण्यात येणाऱ्या ६५ एकर जमिनीचा मोबदला बाजारभावाच्या पाचपट मिळावा, विमानतळात जमीन गेलेल्यांना प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळावा, विमानतळ ठिकाणी नोकऱ्या द्याव्यात, संपादित होणाऱ्या ६५ एकरमध्ये १०० ते १२५ वर्षांपासून लक्ष्मीवाडी मातंग वसाहत आहे. हे पूर्णत: बेघर होणार आहे. त्यांचे पुनर्वसन करावे.निवेदन देताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार, राजू यादव, विराज पाटील, विनोद खोत, पोपट दांगट, प्रवीण पालव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
स्थानिक भूमिपूत्रांना रोजगार द्या, अन्यथा विमानतळावर प्रवाशी रोखू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 6:52 PM
कोल्हापूर : येथील विमानतळावर भूमिपूत्रांना रोजगार द्यावा, अन्यथा विमानतळावर प्रवाशांना रोखू अशा इशाऱ्याचे निवेदन शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना ...
ठळक मुद्देस्थानिक भूमिपूत्रांना रोजगार द्या, अन्यथा विमानतळावर प्रवाशी रोखू शिवसेनेतर्फे इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन