म्हाकवे : हमीदवाडा कारखान्याने स्थापनेपासूनच सभासदांसह कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे अल्पावधीत कर्जमुक्त होण्याबरोबर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारही संपादन केले आहेत. कारखान्याच्या या यशस्वी वाटचालीमध्ये कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार मंडलिक कारखान्याचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक यांनी काढले.सदाशिवनगर (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना कार्यस्थळावर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष प्रकाश पाटील होते. भेटवस्तू देऊन या निवृत्त कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.यावेळी अशोक वार्इंगडे (बेलवळे खुर्द), बाबूराव भोसले (कौलगे), शामराव वायदंडे (बस्तवडे), आनंदा कुंभार (शेंडूर), प्रताप पाटील (कौलगे), नागेश पाटील (गडहिंग्लज), भैरू पुंडे (खडकेवाडा), आदींचा सत्कार झाला.संचालक बंडोपंत चौगुले, आनंदराव फराकटे, विश्वासराव कुराडे, शिवाजीराव इंगळे, आनंदा मोरे, वीरेंद्र मंडलिक, सर्जेराव पाटील, नंदाताई सातपुते, शिवाजी भोसले, आप्पासाहेब तांबेकर, आदींसह कारखान्याचे अधिकारी, सर्व कर्मचारी उपस्थित होते.बापूसाहेब भोसले-पाटील यांनी प्रास्ताविक केले. शांतीनाथ मगदूम यांनी आभार मानले.
कारखान्याच्या यशात कर्मचाऱ्यांचा वाटा
By admin | Published: June 09, 2015 10:50 PM