शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
5
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
6
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
7
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
8
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
9
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
10
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
11
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
12
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
13
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
14
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
15
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
18
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
19
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
20
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देणार

By admin | Published: May 21, 2016 12:06 AM

राजकुमार बडोले : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती, जमातींचा मेळावा

कोल्हापूर : समाजातील जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाहास शासन प्रोत्साहन देणार आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी केले.भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती-जमाती आघाडीतर्फे आयोजित नूतन पदाधिकारी निवड व मेळाव्यात ते बोलत होते. आमदार सुरेश हाळवणकर, भाजपचे जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. येथील शाहू सभागृहात मेळावा झाला. मंत्री बडोले म्हणाले, आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यास दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्यासाठी प्राथमिक चर्चा झाली आहे. याशिवाय त्या दाम्पत्याच्या मुलास शासकीय नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे. नवबौद्धांना राज्य शासन सवलती देत आहे. त्याप्रमाणे केंद्र शासनाकडूनही सवलती मिळाव्यात, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. दलित उद्योजकांना कौशल्यशिक्षण देण्यासाठी नवीन संस्था सुरू करण्यात येतील. या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन दलित उद्योजकांना संधी उपलब्ध करून देवू.अजूनही जातीचा दाखला काढणे, पडताळणी करणे किचकट असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे लवकरच जिल्हानिहाय जात पडताळणी समितीचे कामकाज सुरू होईल. रमाई आवास योजनेतून दारिद्र्यरेषेखालील मागासर्गीय बेघरांना घरासाठी जागाखरेदीसाठी ५० हजार रुपये दिले जातात. त्यामध्ये वाढ करण्यात येईल. कॉँग्रेस पक्षाने निवडणुकांसाठी दलितांचा वापर केला. मात्र विकासाकडे दुर्लक्ष केले. भाजप सत्तेवर आल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरी झाली. डॉ. आंबेडकर यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी शासन नियोजनबद्ध प्रयत्नशील आहे. आमदार हाळवणकर म्हणाले, काँग्रेसच्या स्वार्थी राजकारणास कंटाळून दलित, मागासवर्गीय मतदारांनी देशात आणि राज्यात भाजपला निवडून दिले. त्यानंतर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री बडोले मागासवर्गीयांसाठी प्रभावीपणे काम करीत आहेत. त्यामुळे पुढील २५ वर्षांत राज्यात भाजप सत्तेवर राहील.यावेळी अनुसूचित जातिजमातींच्या आघाडीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड झाली. आघाडीचे अध्यक्ष प्रशांत धनवडे यांनी प्रास्ताविक केले. अमित कांबळे, राजेंद्र सरनाईक, अशोक कांबळे, सुनील इंगवले, दयानंद कांबळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) हाळवणकरांना मंत्रिपद द्यावेराज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. यामध्ये आमदार सुरेश हाळवणकर यांनाही मंत्रिपद मिळावे, अशी मागणी यावेळी सूत्रसंचालकांनी केली. मात्र यावर मंत्री बडोले यांनी भाष्य केले नाही. पगाराची चिंता अधिक जिल्हा परिषद शाळेतील मास्तरला मुलांपेक्षा पगाराची अधिक चिंता असते. अशा शाळेतच मीही अनेक हालअपेष्टा, अवहेलना सहन करीत शिकलो, असे मंत्री बडोले यांनी सांगितले.