कोल्हापूर : मणिकर्णिका कुंडाच्या खुदाईचे काम माऊली लॉजच्या अतिक्रमणामुळे थांबले आहे तरी हे अतिक्रमण महापालिकेने तातडीने उतरवून घ्यावे, कुंडात जाणारे ड्रेनेजचे पाणी थांबवण्यासाठी पाईपलाईन मंदिराबाहेरुन वळवण्यात यावी अन्यथा पूर्व दरवाज्यासमोरील जागेचे सर्वाधिकार देवस्थान समितीला द्यावे, समितीच्यावतीने हे काम पूर्ण केले जाईल असा प्रस्ताव अध्यक्ष महेश जाधव यांनी गुरुवारी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिला.मणिकर्णिका उत्खननाचे काम आता पूर्ण झाले असून केवळ माऊली लॉजच्या अतिक्रमणाखालील जागेचे काम शिल्लक आहे. याबाबत गुरुवारी दुपारी अंबाबाई मंदिराच्या गरुड मंडपात हेरिटेज समितीची बैठक झाली. त्यानंतर सर्वांनी महापालिका प्रशासक बलकवडे यांची भेट घेवून वस्तूस्थिती सांगितली. अध्यक्ष जाधव म्हणाले, बांधकाम नियमावली मोडून ही इमारत उभारण्यात आली आहे. महापालिकेने एक नोटिस पाठवण्यापलिकडे कारवाई केलेली नाही. तरी हे अतिक्रमण तातडीने हटवून ही जागा देवस्थानला परत द्यावी.या चर्चेनंतर प्रशासक बलकवडे यांनी माऊली लॉजचा अडथळा व ड्रेनेज पाईपलाईन याची माहिती घेऊन लवकरात लवकर यावर मार्ग काढण्यात येईल अशी ग्वाही दिली. यावेळी उपायुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, समिती सदस्य शिवाजीराव जाधव, सचिव विजय पोवार, अभियंता सुदेश देशपांडे प्रभारी अभियंता सुयश पाटील, अमरजा निंबाळकर आदी उपस्थित होते.
मणिकर्णिका कुंडावरील अतिक्रमण तातडीने हटवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 5:56 PM
Mahalaxmi Temple Kolhapur- मणिकर्णिका कुंडाच्या खुदाईचे काम माऊली लॉजच्या अतिक्रमणामुळे थांबले आहे तरी हे अतिक्रमण महापालिकेने तातडीने उतरवून घ्यावे, कुंडात जाणारे ड्रेनेजचे पाणी थांबवण्यासाठी पाईपलाईन मंदिराबाहेरुन वळवण्यात यावी अन्यथा पूर्व दरवाज्यासमोरील जागेचे सर्वाधिकार देवस्थान समितीला द्यावे, समितीच्यावतीने हे काम पूर्ण केले जाईल असा प्रस्ताव अध्यक्ष महेश जाधव यांनी गुरुवारी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिला.
ठळक मुद्देदेवस्थान समितीची प्रशासकांकडे मागणी पूर्व दरवाज्यासमोरील जागा ताब्यात देण्याचा प्रस्ताव