दोन मजल्यावरील दुकान गाळे सुरू आहेत. मात्र, तब्बल दहा वर्षांनी महालक्ष्मी संकुलातील पॅसेजमध्ये एका अज्ञाताने जागा आखत अतिक्रमण केले आहे. या दुकान गाळ्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
काहीच्या मते सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्याने हे धाडस केले आहे. तसेच या संबंधित दुकान गाळ्याची पावती काढल्याचे सांगण्यात येते.
सध्या मुख्याधिकारी प्रभारी आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सुस्ती आली आहे. शहरात मोक्याच्या ठिकाणी दुकाने गाळे आखण्याची स्पर्धा सुरू आहे. यातच पालिकेच्या व्यापारी संकुलात अतिक्रमण करून उघडपणे, बेकायदेशीरपणा करून प्रशासनास आव्हान दिले आहे. यामध्ये काय होणार, याकडे सुज्ञ नागरिकांचे लक्ष लागले आहे.
येथे पूर्वीही व्यावसायिकाने दुकानातील साहित्य मांडून व्यावसायिक वस्तू ठेवण्यासाठी अतिक्रमण केले होते. या जागेवर आता दुकान गाळा करण्यासाठी अतिक्रमण केल्यामुळे महालक्ष्मी व्यापारी संकुलात या भागातून ये-जा करताना नागरिकांना कसरत करावी लागते. अतिक्रमणाच्या समस्यांवर नगरपालिका प्रशासनाकडून ठोस कारवाईची अपेक्षा असताना त्यांच्याकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
फोटो - २८०२२०२१-जेएवाय-०६
फोटो ओळ - पेठवडगाव येथील महालक्ष्मी व्यापारी संकुलातील पॅसेजमध्ये असे अतिक्रमण करण्यात आले आहे.