शहरं
Join us  
Trending Stories
1
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
2
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
3
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
4
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
5
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
6
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
7
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
8
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
9
India vs Australia PM XI पिंक बॉल प्रॅक्टिस टेस्ट मॅचला 'वनडे' ट्विस्ट!
10
"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल
11
केवळ इव्हीएम नाही तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविरोधातच काँग्रेस उठवणार आवाज
12
२० किलो सोनं, ४ कोटी रुपयांचा रोकड, ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याकडे सापडलं घबाड 
13
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
14
"हिंदी सिनेमा करु शकणार नाही असा विचार केला होता", अल्लू अर्जुनने प्रमोशनदरम्यान केला खुलासा
15
अनोखा आदर्श! नवविवाहित दाम्पत्याचा कौतुकास्पद निर्णय; ११ गरीब मुलांना घेतलं दत्तक
16
ट्रकमध्ये पैसे, ३६ नोटा मोजण्याच्या मशीन्स; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडलं?
17
"त्याने मला बेडरुममध्ये बोलावलं..." प्रसिद्ध अभिनेत्यावर विनयभंगाचे आरोप; महिलेने केली तक्रार
18
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
19
IPL मधील युवा 'करोडपती' Vaibhav Suryavanshi सचिन-विराटला नव्हे तर या खेळाडूला मानतो आदर्श
20
ना बिग बी, ना सलमान-विराट, हा अभिनेता भरतो सर्वात जास्त टॅक्स, टॉप ५मधून अक्षय कुमार बाहेर

हंगामाच्या शेवटी ‘ब्याडगी’चा ठसका, क्विंटलला हजाराची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 10:57 AM

लाल मिरचीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना मिरचीचा ठसका वाढला आहे. ‘ब्याडगी’, ‘जवारी’, ‘लवंगी’ मिरचीच्या दरात प्रतिक्विंटल एक हजाराची वाढ झाली आहे. कडक उन्हामुळे पालेभाज्यांची आवक मंदावली असून, त्याचा परिणाम दरावर झाला आहे. किरकोळ बाजारात मेथीची पेंढी २५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. भाजीपाल्याच्या दरात मात्र चढउतार दिसत आहे. डाळींच्या दरातील तेजी कायम राहिली आहे.

ठळक मुद्देहंगामाच्या शेवटी ‘ब्याडगी’चा ठसका, क्विंटलला हजाराची वाढपालेभाज्या कडाडल्या : फळभाज्यात मात्र चढउतार

कोल्हापूर : लाल मिरचीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना मिरचीचा ठसका वाढला आहे. ‘ब्याडगी’, ‘जवारी’, ‘लवंगी’ मिरचीच्या दरात प्रतिक्विंटल एक हजाराची वाढ झाली आहे. कडक उन्हामुळे पालेभाज्यांची आवक मंदावली असून, त्याचा परिणाम दरावर झाला आहे. किरकोळ बाजारात मेथीची पेंढी २५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. भाजीपाल्याच्या दरात मात्र चढउतार दिसत आहे. डाळींच्या दरातील तेजी कायम राहिली आहे.यंदा लाल मिरचीची आवक चांगली राहून ग्राहकांना दिलासा मिळेल असे सांगितले जात होते. सुरुवातीच्या टप्प्यात मिरचीचे दर साधारण राहिले. आता मिरचीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना दर चांगलेच कडाडले आहेत. ‘ब्याडगी’ १६० रुपये, ‘जवारी’ १३०, तर ‘लवंगी’ १४० रुपये किलोपर्यंत राहिली आहे. सरासरी क्विंटलमागे एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. आणखी आठ ते दहा दिवस हंगाम तेजीत राहील, त्यानंतर हळूहळू कमी होईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

पालेभाज्यांच्या दरात कमालीची घट झाल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मेथीची पेंढी हातात घेण्यासही भीती वाटत आहे. (छाया - दीपक जाधव)कडक उन्हामुळे पालेभाज्यांची आवक गेले पंधरा दिवस मंदावली आहे. या आठवड्यात तर बाजार समितीत रोज कशीबशी ५०० पेंढ्यांची आवक होते. त्यामुळे दरात वाढ झाली असून, घाऊक बाजारात पेंढीचा दर २० रुपये आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात मेथीची विक्री कशी करायची, असा पेच विक्रेत्यांसमोर आहे.

पालक, पोकळा, शेपू, कांदा पातीचे दरही १५ ते २० रुपये पेंढी आहे. भाजीपाल्याची आवक कमी-अधिक असल्याने दरात चढउतार दिसत आहे. वांगी, टोमॅटो, ढब्बू, ओला वाटाणा या भाज्यांच्या दरात थोडी वाढ झाली असून कोबी, गवार, कारली, भेंडी, वरणा, दोडक्याचे दर स्थिर आहेत. कोथिंबीरची आवक स्थिर असून, किरकोळ बाजारात २० रुपये दर आहे.फळ मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे. कोकणातील हापूसबरोबरच मद्रास हापूस व पायरी आंब्याची आवक झाल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात थोडी घसरण झाली आहे. मद्रास हापूसच्या पेटीमागे सरासरी दोनशे रुपयांची घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात हापूसचा बॉक्स १५० पासून २५० रुपयांपर्यंत आहे. लिंबूची मागणी कायम असून, दरात फारशी चढउतार दिसत नाही. डाळींचे दर चढेच राहिले आहेत. साखर, सरकी तेल, शाबूसह इतर किराणा मालाच्या दरात फारसा फरक झालेला नाही.

घाऊक बाजारातील आंब्याचा दरदाम-आंबा                    आवक               सरासरी दरहापूस                  ६८० पेटी            १२०० रुपयेहापूस                 १०१२० बॉक्स     २२५ रुपयेपायरी                  ४० बॉक्स         ९० रुपयेलालबाग           ५०० बॉक्स         १०० रुपयेमद्रास हापूस          २०० पेटी       ६५० रुपयेमद्रास हापूस        १००० बॉक्स    १२५ रुपयेमद्रास पायरी         ५०० बॉक्स    १०० रुपये

मिरचीची मागणी आणि आवक यात मोठी तफावत असल्याने दरात थोडी वाढ झाली आहे. चांगल्या मालाचे दर सुरुवातीपासूनच चढे राहिले आहेत.- भगवान लोखंडे, मिरची विक्रेते, रुकडी 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर