शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

गणेशोत्सवाचा स्वागत फलक लावताना बसला विजेचा धक्का; तरुण अभियंत्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 6:05 PM

कोल्हापुरात णेशोत्सवाचा स्वागत फलक लावताना फलकाला विजेचा धक्का बसल्याने तरुणाचा मृत्यू झाला.

शिवाजी सावंत गारगोटी : गणेशोत्सवाचा स्वागत फलक लावताना फलकाचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून तरुण अभियंत्याचा जागेवरच मृत्यू झाला तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.अरूण रमेश वडर (वय २३, रा.शिवाजी नगर,गारगोटी)असे त्या तरुणाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी,अवघ्या आठ दिवसांवर गणेशोत्सव आल्याने तरुण मंडळाचे स्वागत फलक उभारण्यासाठी तरुणांची लगबग सुरू झाली आहे. शुक्रवारी रात्रीच्या दहाच्या सुमारास येथील शिवाजी नगरातील अष्टविनायक तरुण मंडळाचे सदस्य बसस्थानक परिसरातील गारगोटी कोल्हापूर मार्गावरील पाटबंधारे कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ स्वागत फलक लावत होते. त्यावेळी अनवधानाने या फलकाचा उच्चविद्युत प्रवाह असणाऱ्या तारेला स्पर्श झाला.

विजेचा प्रवाह सुरू असल्याने फलक धरलेल्यांना जोराचा धक्का बसला. यामध्ये अरूण रमेश वडर यांचा जागीच मृत्यू झाला तर श्रीधर वडर,अमोल सुतार,अविनाश भोपळे,सौरभ शालबिद्रे,विशाल वडर (सर्वजण रा.शिवाजीनगर,गारगोटी)हे पाचजण  धक्याने रस्त्यावर फेकले गेले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. यातील एकाची प्रकृती चिंतजनक आहे. या सर्वांना उपजिल्हा रुग्णालय गारगोटी येथे प्राथमिक उपचार करून सीपीआर रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. रात्री उशिरापर्यत जिल्हा बँकेचे संचालक प्राचार्य अर्जून आबिटकर,शेखर देसाई रुग्णालयात उपस्थित होते.

नुकतीच इंजिनिअरिंगची पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या अरूण याच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. या परिस्थितीत त्यांने आपले इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केले होते. एकुलत्या एका तरुण मुलावर काळाने झडप घातल्याने वडर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई वडिल एकुलत्या एका मुलाचा आधार हरपल्याने धायमोकलून रडत आहेत. तर संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई वडील, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

गेल्या दोन दिवसापासुन तालुक्यातील सर्व गावांत गणेश उत्सव तरुण मंडळांचे उत्साही तरुण गणेशोत्सव फलक,स्वागत कमानी,मंडळांचे नेत्यांचे,पदाधिकारी यांचे डिजिटल फलक लावण्यासाठी चढाओढ करीत आहेत. रस्त्याच्या कडेला आणि जागा मिळेल तिथे विद्युत पुरवठा सूरू असलेल्या खांबाला टेकून डिजिटल फलक लावण्यात तरुणाई मग्न आहे. त्यांना याचे भान नसल्याने जिवावर बेतू शकते. पण या गोष्टीकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. त्यांनी आपल्या जीवाची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी असे फलक लावल्यास कारवाईचा बडगा उचलला पाहिजे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

डॉ. सुतार यांच्या प्रथमोपचाराने जीव वाचला... 

धक्का बसल्याने अविनाश भोपळे यांचे डोके रस्त्यावर आपटल्याने डोक्यास गंभीर इजा झाली होती. त्यांना कार्यकर्त्यांनी उचलून डॉ. सुतार यांच्या दवाखान्यात नेले. डॉ.सुतार यांनी तातडीने प्राथमिक उपचार केल्याने भोपळे यांचा जीव वाचला असल्याचे घटनास्थळावर बोलले जाते होते. "तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवाचे फलक लावताना विजेच्या खांबाचा अथवा विद्युत प्रवाह असलेल्या तारांपासून सुरक्षित अंतरावर फलक उभारावेत.स्वतःची आणि इतरांच्या जीवाची काळजी घ्यावी," - प्रांताधिकारी हरेश सुळ 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातGaneshotsavगणेशोत्सव