कोल्हापूर : भारतातील गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी महाविद्यालये ही सर्वसामान्य माणसाच्या व एकूण ग्रामीण समाज उन्नतीचे माध्यम बनावे, असे प्रतिपादन राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे सल्लागार डॉ. अजित पाटणकर यांनी केले.
येथील केआयटी कॉलेजमध्ये संशोधन आणि विकास विभागातर्फे आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. केआयटी विद्यार्थ्यांच्या नवनवीन कल्पना समाजासाठी उपयुक्त ठराव्यात, या हेतूने काईट व आगामी आयडिया लॅब या माध्यमातून चांगला प्रयत्न करीत आहे. विद्यार्थी, प्राध्यापकांच्या संशोधनाचा उपयोग समाजासाठी व्हावा, अशी अपेक्षा डॉ. पाटणकर यांनी व्यक्त केली. केआयटीचे संचालक डॉ. विलास कार्जिन्नी यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी, सचिव दीपक चौगुले यांनी केआयटीची भविष्यातील उद्दिष्टे स्पष्ट केली. संशोधन व विकास अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे यांनी प्रस्तावित आयडिया लॅबची माहिती दिली. डॉ. अमित सरकार यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. मनोज मुजुमदार यांनी आभार मानले. प्रा. प्रमोद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी केआयटीचे अध्यक्ष भरत पाटील, विश्वस्त यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो (११०२२०२१-कोल-केआयटी कॉलेज) : कोल्हापुरातील केआयटी कॉलेजमध्ये राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग आणि अणुऊर्जा विभागाचे सल्लागार डॉ. अजित पाटणकर यांचे स्वागत केआयटीचे उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी यांनी केले. यावेळी डावीकडून दीपक चौगुले, व्ही. व्ही. कार्जिन्नी, अमित सरकार, एम. एम. मुजुमदार, शिवलिंग पिसे, एस. एम. खाडीलकर आदी उपस्थित होते.