शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; मात्र सोलापुरात देवेंद्र फडणवीसांची एकही सभा नाही!
2
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
3
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
4
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
5
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
6
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
7
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
8
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
9
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
10
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
11
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
12
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
13
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
14
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
17
आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात  
18
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
19
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
20
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."

इंग्रजीतून ६१३ विद्यार्थी मराठी माध्यमात

By admin | Published: November 14, 2016 9:36 PM

४५0 शाळा होणार डिजिटल : १४३८ शाळा झाल्या तंबाखूमुक्त

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजना आणि उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. गतवर्षी इंग्रजी शाळांमध्ये शिकत असलेली ६१३ मुले पुन्हा मराठी शाळांमध्ये येणे, १४३८ शाळा तंबाखूमुक्त होणे यातून हे बदलते चित्र स्पष्ट होत आहे. सलाम मुंबई फाऊंडेशनने तंबाखूमुक्त शाळेसाठी शिक्षण विभागाबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात काम सुरू केले आहे. तंबाखूमुक्त शाळेसाठी १0 निकष ठरविण्यात आले आहेत. अगदी शाळेपासून किती अंतरावर पानाची टपरी असावी, इथपासून शिक्षकांच्या तंबाखू खाण्यापर्यंतचे हे निकष आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील २00४ प्राथमिक शाळांपैकी १४३८ शाळा तंबाखूमुक्त झाल्याने हे शिक्षण विभागाला मिळालेले मोठे यश आहे. ही संख्या वाढविण्यासाठी आता प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. गावागावांत इंग्रजी शाळांचे पेव वाढले असताना जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पालक दुर्लक्ष करीत होते. इंग्रजीची अनावश्यक ओढ, त्यासाठीचा अट्टाहास यांचा विचार करता इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये भराभर मुले घातली गेली. मात्र, एकूणच या शाळांतील सर्वसाधारण इंग्रजी अध्यापनाचा दर्जा हा तितकासा चांगला नाही, ही वस्तुस्थिती आहे. ग्रामीण भागातील अनेक नव्याने सुरू झालेल्या इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये हा दर्जा राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न होताना दिसत नाहीत. उलट जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणात्मक बदल होत असल्याचे जाणवल्यानंतर ६१३ विद्यार्थ्यांच्या पालकांनी पुन्हा मराठी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, शिक्षण सभापती अभिजित तायशेटे, शिक्षण समितीचे सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांच्या अथक प्रयत्नांतून ही उद्दिष्ट्ये साध्य केली आहेत. दबावाच्या राजकारणात चांगले कामशिक्षकांच्या बदल्यांच्या विषयावरून शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांना टार्गेट करण्याचा अनेकवेळा प्रयत्न झाला. याबाबत पदाधिकारी आणि त्यांच्यामध्ये मतभेदही झाले. जिल्हा परिषदेत त्याची जोरदार चर्चाही झाली. मात्र, यातूनही पदाधिकारी आणि जिल्हा परिषद सदस्यांना शक्य तेवढे सहकार्य करीत सुभाष चौगुले यांनी चांगले काम करण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे. डॉ. कुणाल खेमनार यांचे अधिकाऱ्यांना असलेले पाठबळीही यासाठी महत्त्वाचे ठरले आहे. म्हणून संघटनांच्या नेत्यांनाही निलंबित करण्याचे धाडस दाखविले गेले. तालुकानिहाय मराठी माध्यम प्रवेश व तंबाखूमुक्त शाळातालुकाविद्यार्थ्यांची तंबाखूमुक्त संख्याशाळाआजरा३६८0भुदरगड९२१0८चंदगड७८९९गडहिंग्लज५९१0९गगनबावडा0६७0हातकणंगले५९१२0कागल५७१३३करवीर४५१२0पन्हाळा४0१0६राधानगरी४५१९३शाहूवाडी३२१८९शिरोळ६४१११एकूण६१३१४३८लोकसहभाग आणि जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून ४४२ डिजिटल शाळांमध्ये ई-लर्निंगच्या माध्यमातून अध्यापन केले जाते. त्यासाठी रोटरी क्लबने १२३ शाळांना सॉफ्टवेअर प्रदान केले आहेत. यावर्षी स्वनिधीतून दीड कोटी रुपये उपलब्ध करू न देण्यात आल्याने ४५0 शाळा डिजिटल करण्यात येणार असून, तेथेही ई-लर्निंगच्या माध्यमातून अध्यापन सुरू होणार आहे.