इचलकरंजी : वारणा नदीतून शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या नळ योजनेसाठी अत्यावश्यक असलेले पाण्याचे आरक्षण निश्चित झाले नसल्यामुळे ही नळ योजना अडचणीत आली आहे. तसेच या नळ योजनेचा काम सुरू करण्याचा कालावधी संपत आल्यामुळे वारणा नळ योजनेची फेरनिविदा काढावी लागेल. ज्यामुळे नगरपालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. म्हणून वारणा योजनेच्या पाणी आरक्षणाची अडचण दूर करावी, अशा आशयाचे निवेदन कॉँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी आमदार सुरेश हाळवणकर यांना दिले आहे.उन्हाळ््यामध्ये पंचगंगा नदीचे पाणी दूषित होते. तर कृष्णा योजनेला लागणाऱ्या सततच्या गळतीमुळे शहराचा पाणीपुरवठा वारंवार खंडित होतो. म्हणून वारणा नळ योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या अमृत अभियान योजनेतून ही योजना साकारणार आहे. वारणा नळ योजनेला ४ जानेवारी २०१७ ला तांत्रिक समितीची मान्यता मिळाली आहे. नळ योजनेचे काम करण्यासाठीची निविदा मक्तेदार आर. ए. घुले यांना देण्यात आली आहे.मात्र, वारणा धरणामध्ये शहरासाठी होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे आरक्षण अद्यापही निश्चित करण्यात आलेले नाही. सदरचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे प्रलंबित आहे. निविदा मंजूर असली तरी पाण्याचे आरक्षण निश्चित झाल्याशिवाय मक्तेदाराला काम सुरू करण्याचे आदेश दिले जाणार नाहीत. निविदेचा कालावधी १२० दिवसांचा असून, तो ११ फेब्रुवारीला संपला आहे. त्यानंतर मक्तेदाराने मागणी केल्याप्रमाणे त्याला ६0 दिवसांचा कालावधी वाढवून दिला आहे. ही मुदत ११ एप्रिल २०१७ ला संपत आहे. केवळ ३४ दिवस शिल्लक राहिल्यामुळे शासनस्तरावर पाणी आरक्षणाची निश्चिती करण्यात यावी; अन्यथा फेरनिविदा काढावी लागल्यास नगरपालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे, असेही नगरसेवक बावचकर यांनी या निवेदनात स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)आमदार सुरेश हाळवणकर यांना निवेदनपाणीपुरवठ्याचा आरक्षणाचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे प्रलंबित
वारणा योजनेचे पाणी आरक्षण निश्चित करा
By admin | Published: March 10, 2017 11:54 PM