हनुमान दूध संस्थेत हे शिबिर पार पडले. शिबिराचे उद्घाटन भुदरगड पं. समितीच्या सभापती सौ. कीर्ती देसाई यांनी केले. यावेळी गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे व अभिषेक डोंगळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सभापती सौ. देसाई म्हणाल्या, "अभिषेक डोंगळे यांनी समाजकारणाची जोड देऊन राजकारण सुरू केले आहे. ते भविष्यात तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण करतील. गणपतराव आबाजी डोंगळे व वडील अरुण डोंगळे यांचा वैचारिक वारसा घेऊन ते प्रवास करत आहेत.
यावेळी जिल्हा, तालुक्यातील विविध पक्षांच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी दूरध्वनीवरून व काहींनी प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
संजीवनी ब्लड बँक व शाहू ब्लड बँकेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी अनेक तरुणांची रक्तशुगर, पेशीसंख्या आदीसह तपासणी करण्यात आली.
यावेळी संयोजन घोलप, प्रीती राजपूत, सूरज मगदूम, सुलभा साळोखे, उमेश पाटील, अनिल सरनोबत, सुहास डोंगळे, माजी सरपंच राजेंद्र चौगले, मारुती चौगले, पांडुरंग चव्हाण, मुकुंद पाटील, उदय पाटील, तानाजी डोंगळे, सर्जेराव पाटील यांनी केले.
फोटो ओळी :
गोकुळच्या निवडणुकीची ज्यांनी बाजी पलटवली, त्या अरुण डोंगळे यांनी आपला राजकीय वारसदार निश्चित करत भव्य अशा मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर घेत अभिषेक डोंगळे यांचा राजकीय प्रवेश केला. याप्रसंगी अरुण डोंगळे, अभिषेक डोगळे, सौ. कीर्ती देसाई.