गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत विजय मिळविलेले नवीद मुश्रीफ यांच्या अभिनंदनासाठी तालुक्यातीत कार्यकर्त्यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून गर्दी केली आहे. अभिनंदन करण्यासाठी आलेल्यामध्ये दूध संस्थाचे पदाधिकारी, दूध उत्पादकांची संख्या जास्त आहे. दरम्यान आज मंत्री मुश्रीफ हे मुंबईहून आल्याने जिल्ह्यातील प्रमुख नेतेमंडळीही मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आले होते. मंत्री मुश्रीफ आणि नवीद मुश्रीफ यांचेही अभिनंदन करण्यात येत होते.
गोकूळच्या निवडणुकीत नवीद मुश्रीफ यांना उमेदवारी देण्याचा आग्रह प्रमुख कार्यकर्त्यांनी केला होता. कारण गेली दहा बारा वर्षे ते मुश्रीफ फाउंडेशन आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. प्रत्येक निवडणुकीत प्रचाराची धुरा तसेच पडद्यामागच्या हालचालीमध्ये सहभागी असतात. त्यामुळे त्यांना संधी मिळाली पाहिजे, अशी भावना मुश्रीफ गटात होती. जिल्हा परिषद निवडणुकीत एकतर्फी वातावरण असताना त्यांचा काही मतांनी पराभव झाला होता. या पराभवाची खंत आणि सल गटात होती. ती या विजयाने भरून निघाल्याने अभिनंदनासाठी तिसऱ्या दिवशीही गर्दी होती. नवीद मुश्रीफ हे जिल्ह्यातील प्रमुख नेतेमंडळीनां भेटून आशीर्वाद घेत आहेत.
चौकट
जिल्ह्यातील ठरावधारकांशी संपर्क
निवडणूक जाहीर झाल्यानंतर नवीद मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांचा दौरा करून गाव वाडी वस्तीमधील ठरावधारकांच्या घरी जाऊन मंत्री मुश्रीफ आणि मंत्री सतेज पाटील यांची भूमिका पोहचविण्याचे काम केले. याचा फायदा त्यांच्यासह विरोधी पॅनलला झाला.
०७ कागल नावेद मुश्रीफ
फोटो कॅपशन
गोकूळमधील विजयानंतर कागल तालुक्यातील सर्वसामान्य दूध उत्पादक त्यांचे अभिनंदन करण्यासाठी निवासस्थानी येत आहेत.