सरवडे : ई-स्टोअर इंडिया कंपनीचे नॅशनल कोर टीमचे हेड व उद्योजक विनायक राऊत यांचा वाढदिवस सामाजिक बांधीलकी जोपासत साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही कार्यक्रम नसल्याने जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, व्यापारी, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, कुटुंब, नातेवाईक, ग्रामस्थ, आदी क्षेत्रातील मान्यवर व पदाधिकाऱ्यांनी दूरध्वनी व सोशल मीडियाद्वारे श्री. राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तर सोशल डिस्टन्सचा वापर करीत विविध गावांतील अनेक गरजू गरीब, विधवा महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
शुभेच्छा देताना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, कष्ट, बौद्धिक कौशल्य यांचा मेळ घालत स्वत:बरोबरच इतरांचाही विकास व्हावा हा हेतू ठेवून दातृत्वशील विनायक राऊत यांनी अनेकांचे कल्याण केले आहे. विविध व्यवसायातून रोजगार उपलब्ध करून त्यांनी सामाजिक हित जोपासले आहे. ई-स्टोअर कंपनीच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीतून मराठी माणूस देशभर पोहोचू शकतो असा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे.
‘बिद्री’चे उपाध्यक्ष विजयसिंह मोरे म्हणाले, राऊत यांच्यासारखे दातृत्व समाजाला उपयोगी ठरत असून, त्यांचे कार्य आदर्शवत आहे.
उद्योजक विनायक राऊत म्हणाले, सामाजिक, शैक्षणिक कार्य करीत असताना तमाम जनतेने आपल्याला दिलेल्या प्रेमाने, आपुलकीने भारावून गेलो आहे. भविष्यातही याहीपेक्षा मोठ्या ताकदीने सामाजिक कार्य करणार असून, विकासात्मक टप्पा पूर्ण करावयाचा आहे. यासाठी सर्वांच्या पाठबळाची गरज आहे.
सकाळपासून रात्री उशिरापर्यंत राऊत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता.
कासारवाडा पाटणकर येथे गरजू गरीब महिलांना धान्य वाटप तसेच बिद्री येथे अपंगांना त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धान्य वाटप करण्यात आले.
दिवसभरात त्यांना नाविद मुश्रीफ, धैर्यशील देसाई, विजयसिंह मोरे, डॉ. फैजान खान, अनिल पाटील, प्रकाश पाटील, संजय सावंत, बी. एस. पाटील, किरण पाटील, डी. एम .चौगुले, शाहू चव्हाण, संजय मोरे, ज्ञानेश्वर पवार, सागर सावर्डेकर, एस. एम. पाटील, विष्णुपंत जाधव, डॉ. तानाजी हरेल, के. एस. पोवार यांनी शुभेच्छा दिल्या.
.............
फोटो
कासारवाडा येथील उद्योजक विनायक राऊत यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करताना आमदार प्रकाश आबिटकर, गारगोटीचे सरपंच संदेश भोपळे. शेजारी ई-स्टोअर इंडियाचे पदाधिकारी.