कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेत आपल्या देशाच्या उत्पादनांना अधिक मागणी आहे. आपल्या उद्योजकांमध्ये क्षमता आहे; पण त्यांनी स्वत:ला एक मर्यादा घालून घेतली आहे. त्यांनी निर्यातीचे धाडस करून विकासासाठी देशाची सीमा ओलांडण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी शुक्रवारी येथे केले.येथील ‘एसएमई मॅन्युफॅक्चरर्स अँड एक्स्पोर्टर्स समिट’ या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र इंडस्ट्रियल अॅँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असोसिएशन आणि एसएमई चेंबर आॅफ इंडियातर्फे लघु व मध्यम उद्योजकांचा विकास व निर्यातवाढीसाठी परिषद घेण्यात आली. हॉटेल सयाजीमधील या कार्यक्रमास घोडावत एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रेणिक घोडावत, एसएमई चेंबर आॅफ इंडियाचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे प्रमुख उपस्थित होते. खासदार महाडिक म्हणाले, कौशल्यपूर्ण व दर्जेदार उत्पादन निर्मितीची क्षमता असणाऱ्या कोल्हापुरातील उद्योजकांनी ग्लोबल व्हावे. त्यांना जगभरात अनेक संधी उपलब्ध असून ते साधण्याच्या दृष्टीने कार्यरत राहावे. यासाठी उद्योजकांनी ‘एसएमई’ची मदत घ्यावी. व्यवस्थापकीय संचालक घोडावत म्हणाले, उद्योजकांनी पाच वर्षांचा आराखडा डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करावी. स्वत:चा ब्रॅँड विकसित करताना संबंधित देश लक्षात घ्यावा. जागतिक बाजारपेठेत कोल्हापूरचा ठसा उमटवायचा असल्यास उद्योजकांना बळ देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा.अध्यक्ष साळुंखे म्हणाले, जगातील ४६ देशांशी एमएमई चेंबर आॅफ इंडिया कार्यान्वित आहे. जानेवारीमध्ये ‘वेस्टर्न महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिट- डेस्टिनेशन कोल्हापूर’ घेण्यात येईल. कार्यक्रमास ‘एसएमई’चे संचालक महेश साळुंखे, आदींसह कोल्हापूर, सांगली, इस्लामपूर परिसरातील उद्योजक उपस्थित होते.दरम्यान, उद्घाटनानंतरच्या सत्रात बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमधील ‘एसएमई’चे प्रमुख अजय ठाकूर, स्टेट बँक आॅॅफ इंडियामधील ‘एसएमई’चे जी. एस. राणा, ‘एसआयडीबीआय’चे कोल्हापूर विभागीय व्यवस्थापक भगवान चंदाणी, ईसीजीसी लिमिटेडचे अफसाना शेख, पुण्यातील स्टेट बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक सचिन तिजारे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. (प्रतिनिधीनियोजनबद्ध प्रयत्न करावेतचिनी वस्तूंना विरोध वाढत असल्याने जगात आपला देश ‘नेक्स्ट डेस्टिनेशन’ म्हणून भविष्यात निश्चितपणे पुढे येणार आहे. ते लक्षात घेऊन उद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले. ते म्हणाले, सामूहिक शेती अथवा शेतकऱ्यांनी एकत्रित यावे. उद्योजकांनी संघटित व्हावे. उत्पादनाचे मार्केटिंग करण्यासह दर्जेदार उत्पादनांची संख्यात्मक मागणी पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत.
उद्योजकांनी देशाची सीमा ओलांडावी
By admin | Published: October 22, 2016 1:02 AM