शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

इथेनॉल प्रकल्प उभारणीसाठी स्वभांडवल हीच मोठी अडचण, राज्यात 'इतक्या' कारखान्यांकडे प्रकल्प 

By विश्वास पाटील | Published: August 08, 2023 3:21 PM

साखरेला फाटा देऊन इथेनॉलचा पर्याय

विश्वास पाटीलकोल्हापूर : राज्यातील साखर कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्प उभारणी करण्यात स्वभांडवलाची उभारणी हीच सगळ्यात मोठी अडचण असल्याचे चित्र आहे. राज्यात सध्या दोनशेपैकी १२२ कारखान्यांकडे इथेनॉल उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्राची २२६ कोटी लिटर इथेनॉल पुरवठा करण्याची क्षमता राज्याने २४४ कोटीपर्यंत वाढवली आहे.केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी रविवारी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात राज्यातील सर्वच साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनांकडे वळले पाहिजे, असा आग्रह धरला. इथेनॉलमुळे कारखानदारीला मोठा आर्थिक आधार मिळतो, हे खरे असले तरी सरसकट सर्वच कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनांकडे वळण्यातही अडचणी आहेत. ज्या कारखान्यांनी आता हे प्रकल्प सुरू केलेले नाहीत, त्यातील बहुतांशी उणे नेटवर्थमधील आहेत. त्यांना सरकारने मदत करून प्रकल्प सुरू करायचा म्हटले तरी स्वभांडवलासाठी १० टक्के रक्कम लागते. ती आणायची कोठून हा तिढा आहेच. क्षमतेनुसार प्रकल्पाची किंमत कमी जास्त होत असली तरी किमान शंभर कोटींची गुंतवणूक या प्रकल्पासाठी करावी लागते.कारखान्याचे गाळप संपल्यानंतर जेवढे मोलॅसिस उपलब्ध असेल त्यातून तीनशे दिवस प्रकल्प चालवता येणार नाही. तेवढ्या कमी क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही. दुसरे महत्त्वाचे म्हणजे सर्वच कारखान्यांनी इथेनॉल उत्पादन सुरू केल्यावर मोलॅसिसचा तुटवडा भासू शकतो. त्यासाठी इतर धान्यापासून इथेनॉल निर्मिती हा पर्याय आहे. तांदूळ, मक्यापासून असे उत्पादन घेता येते. परंतु हे धान्य पुरवठ्यातील केंद्र शासनाचे धोरण फारच धरसोडीचे आहे. देशातील अन्नधान्याच्या टंचाईवर त्याचे निर्णय होतात. त्यामुळे पर्यायी धान्य न मिळाल्यास इथेनॉल उत्पादन करायचे कशातून हा प्रश्न आहे. केंद्र शासनाने तांदळापासून इथेनॉल करण्यावर नुकतेच निर्बंध घातले आहेत. मग त्यावर उपाय म्हणून देशाची गरज आहे तेवढ्याच साखरेचे उत्पादन करून ब्राझीलप्रमाणे बी हेवी मोलॅसिसचा वापर करून इथेनॉल करण्यास प्राधान्य द्यावे लागेल. आता पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणास परवानगी आहे. हेच प्रमाण २०२५ पर्यंत २० टक्क्यांवर नेण्याचा केंद्र शासनाचा प्रयत्न आहे.

महाराष्ट्रातील इथेनॉल उत्पादनप्रकल्प -संख्या - क्षमता (कोटी लिटर)सहकारी - ४२ : ६४.९०खासगी - ४२ : ९९.११स्वतंत्र प्रकल्प - ३८ : ६१.८५एकूण १२२ प्रकल्प : २२६तीन वर्षातील मागणी-पुरवठा-(कोटी लिटरमध्ये)साल : मागणी : पुरवठा : टक्केवारी२०२०-२१ : १०८ : ९७ : ८९.८१२०२१-२२ : १२० : १०२ : ८५.००२०२२-२३ : १३२ : ८७.११ : ६५.९० (जूनअखेर) 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने