शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

कोल्हापूर जिल्ह्यातील बिघडलेली समीकरणे मिटवा : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 12:50 AM

कोल्हापूर : जिल्ह्यात काँग्रेसला अनुकूल वातावरण असतानाही मी मंत्री...का तू मंत्री...असे करत एकमेकांच्या पायात पाय घातल्याने पक्षावर ही वेळ आली आहे,

ठळक मुद्देआवळेंची गटबाजीबद्दल खदखद; पतंगरावांची विषय संपविण्याची ग्वाही, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठकजयवंतराव काळजी करू नका, मी येथील विषय संपवितो

कोल्हापूर : जिल्ह्यात काँग्रेसला अनुकूल वातावरण असतानाही मी मंत्री...का तू मंत्री...असे करत एकमेकांच्या पायात पाय घातल्याने पक्षावर ही वेळ आली आहे, अशा शब्दांत माजी समाजकल्याण मंत्री जयवंतराव आवळे यांनी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यासमोरच शुक्रवारी खदखद व्यक्त केली. यावर माजी वनमंत्री आमदार पतंगराव कदम यांनी मी इथला पालकमंत्री राहिल्याने मला सर्व माहीत असून हा विषय मी संपवितो, असे सांगितले, तर काँग्रेसची जिल्ह्यातील बिघडलेली समीकरणे बसून मिटवा, अशी विनंती कदम यांना चव्हाण यांनी केली.

स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पतंगराव कदम, जयवंतराव आवळे, आमदार सतेज पाटील, प्रभारी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा अंजना रेडेकर, शहराध्यक्षा संध्या घोटणे, माजी मंत्री भरमू पाटील, प्रकाश सातपुते, गुलाबराव घोरपडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी नांदेड महापालिकेत एकहाती काँग्रेसची सत्ता आणल्याबद्दल अशोक चव्हाण यांचा जिल्हा कॉँग्रेसतर्फे पुष्पहार, अंबाबाई मूर्तीची प्रतिकृती व शाल देऊन सत्कार करण्यात आला.जिल्ह्यातील कॉँग्रेसच्या सध्याच्या अवस्थेला दुसरे कोणीही जबाबदार नाही तर पक्षातील घरभेदीच याला कारणीभूत असल्याचे आवळे यांनी सांगितले. काँग्रेसशी गद्दारी करणाºयांना जागा दाखविण्याची वेळ आली असून हे मतभेद दूर केल्यावर पक्ष राज्यात ‘क्रमांक एक’वर जाईल, असेही त्यांनी सांगितले.

त्यावर पतंगराव कदम यांनी मी पालकमंत्री राहिल्याने मला येथील सर्व विषय माहिती असून जयवंतराव काळजी करू नका, मी येथील विषय संपवितो. एकदा ठरवून निर्णय घेतला की येथील लोक ऐकतात, महापालिका निवडणुकीत न ऐकणाºया महादेवराव महाडिकांना तुमचे आमचे जमणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.आवळे यांच्या भाषणाचा धागा पकडत जुने विषय घोळून चालणार नाही, तर नव्या पिढीला संधी देत सर्वांना बरोबर घेत चांगले काम करूया व पक्ष राज्यात व पश्चिम महाराष्टÑात कोल्हापूर ‘क्रमांक एक’वर आणूया, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले तसेच कॉँग्रेसची जिल्ह्यातील बिघडलेली समीकरणे बसून मिटवून तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल, अशी विनंती कदम यांना चव्हाण यांनी केली.भ्रमात राहू नकाराज्यातील सर्व घटक भाजप सरकारवर नाराज आहेत, असे असले तरी कॉँग्रेसला फायदा होईल या भ्रमात न राहता सत्तेत येण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येक बूथपर्यंत पोहोचून पक्षाची संघटनात्मक यंत्रणा भक्कम करावी, असे आवाहन चव्हाण यांनी केले.१२ डिसेंबरच्या मोर्चात ताकदीने उतरणारकर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात १२ डिसेंबरला काढण्यात येणाºया धडक मोर्चात जिल्ह्यातून मोठ्या संख्येने व ताकदीने जाऊ, अशी ग्वाही पी. एन. पाटील यांनी दिली.‘दादां’चा रोज एकाला ‘हार’वर्तमानपत्रात रोज महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे महामंडळासह विविध पदे देतो, असे सांगून रोज एकाला भाजपमध्ये प्रवेश देत हार घालत असल्याच्या बातम्या वाचायला मिळत आहेत. त्यामुळे तिकडे जाणाºयांची संख्याही वाढली असून हे पुरोगामी विचारांच्या कोल्हापूरसाठी खेदजनक असल्याची टीका पतंगराव कदम यांनी केली. आता वातावरण बदलत असून गेलेल्यांना परत घ्यायचे की नाही याचा निर्णय मी व अशोक चव्हाण घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.