शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

‘ईएसआयसी’ची ओपीडी लवकरच : श्रावणी अकोळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 1:18 AM

कोल्हापूर : एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या (ईएसआयसी) रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) लवकरच सुरू होणार आहे. त्या ठिकाणी इतर सेवा-सुविधा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील, अशी माहिती ‘ईएसआयसी’च्या शाखाधिकारी श्रावणी अकोळकर आणि रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दुष्यंत खेडीकर यांनी बुधवारी येथे दिली.‘लोकमत’ने दि. २४ आॅगस्टचा अंकात ‘औषधांअभावी सुरू होईना ‘ईएसआय’ रुग्णालय’ हे ...

ठळक मुद्देकोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाचे निवेदन

कोल्हापूर : एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या (ईएसआयसी) रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) लवकरच सुरू होणार आहे. त्या ठिकाणी इतर सेवा-सुविधा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील, अशी माहिती ‘ईएसआयसी’च्या शाखाधिकारी श्रावणी अकोळकर आणि रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दुष्यंत खेडीकर यांनी बुधवारी येथे दिली.

‘लोकमत’ने दि. २४ आॅगस्टचा अंकात ‘औषधांअभावी सुरू होईना ‘ईएसआय’ रुग्णालय’ हे वृत्त दिले होते. त्यानंतर कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने ‘ईएसआयसी’च्या शाखाधिकारी अकोळकर आणि वैद्यकीय अधीक्षक खेडीकर यांची भेट घेतली. त्यामध्ये ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, शिवाजीराव पोवार, धनंजय दुग्गे, माजी अध्यक्ष आनंद माने, प्रदीपभाई कापडिया, सचिव एस. ए. औंधकर, आदींचा समावेश होता.

यावेळी अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, जिल्ह्यात सुमारे ८० हजार कामगारांची ‘ईएसआयसी’अंतर्गत नोंदणी आहे. त्या प्रमाणात वैद्यकीय सुविधा अपुरी आहे. त्यामुळे सर्व सुविधांसह रुग्णालय लवकर सुरू करावे. उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी ईएसआयसी रुग्णालयाअभावी उद्भवलेल्या अडचणी सांगितल्या. त्यावर शाखाधिकारी अकोळकर आणि वैद्यकीय अधीक्षक खेडीकर यांनी लवकरात लवकर ईएसआयसीची ओपीडी सुरू केली जाईल, असे सांगितले.बैठक घ्याया ईएसआयसी रुग्णालयाबाबतच्या विविध अडचणींचे निराकारण होण्यासाठी विभागीय संचालक संजय सिन्हा आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात यावी, अशी मागणी कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी केली. याबाबतचे पत्रदेखील त्यांनी दिले आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल