कोल्हापूर : ऐक्याचे प्रतीक असलेल्या बाबूजमाल दर्ग्यातील ‘हजरत नाल्या हैदर कलंदर पंजा’ , बेबी फातिमा पंजा व लक्ष्मीपुरी येथील गरीबशहा नवाज पंजाची रविवारी रात्री उशिरा प्रतिष्ठापना करण्यात आली.हिंदू व मुस्लिम धर्मीयांच्या ऐक्याचे प्रतीक असलेल्या बाबूजमाल दर्ग्यातील हजरत नाल्या हैदर कलंदर पंजा व बेबी फातिमा पंजा यांची रविवारी रात्री उशिरा प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी जमाल झारी, बालम झारी, दर्ग्याचे मुजावर शकील मुतवल्ली, दिलावर मुजावर, ऐनुद्दीन मुजावर, अलमा मुतवल्ली, आदी उपस्थित होते.
लक्ष्मीपुरी येथील गरीबशहा नवाज पंजाचीही प्रतिष्ठापना करण्यात आली. यानंतर खरी कॉर्नर परिसरातील अवचित पीरचा ‘सात अस्मान के बादशहा शेर-ए खुदा मौला अली अवचितपीर,’ शिवाजी पेठेतील सरदार तालीम मंडळाचा ‘चाँदसाब’ पंजा, नंगीवली तालीम मंडळचा ‘हजरत पीर नंगीवली साहेब’ पंजा या पंजांसह तुकाराम माळी तालीम मंडळ, बाराईमाम तालीम, पंचगंगा तालीम मंडळ व छत्रपती घराण्याचे सरकारी पंजे, मिलिटरी परिसरातील ‘दस्तगीर हजरत मेहबूब सुबहानी पंजा,’ शिवाजी चौकातील घुडणपीर पंजा, आदी ठिकाणीही पंजे प्रतिष्ठापना केली जाते.