आंबा : किल्ले विशाळगडचे विद्रुपीकरण रोखून येथील शिवकालीन इतिहासाचे संवर्धन करण्यासाठी पावनखिंड-गजापूरसह सहा गावे एका झेंड्याखाली आली आहेत. गडावरील स्वच्छता, अतिक्रमण, ऐतिहासिक वास्तूंचे पुनर्जिवन करून येथे येणाऱ्या पर्यटकांना सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील राहण्यासाठी येथील व्यवसायिक व स्थानिक स्वराज्य संस्थेने कंबर कसली आहे. पावनखिंड, गजापूर व विशाळगड येथील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सात गावच्या तरुणांचे विकास प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले.
अठ्ठावीस वर्षांपूर्वी गेळवडे धरणामुळे गजापूर पंचक्रोशीचे विस्थापन झाले नि विखुरलेल्या वस्त्यांची मनेही विखुरली; पण गेल्या आठवड्यात स्थानिक व्यावसायिकाला झालेल्या मारहानीचे निमित्त झाले नि सारा समाज संघटित झाला. परस्परातील मतभेद व राजकीय गटतट बाजूला सारून तब्बल तीन दशकांनंतर कासारी खोºयातील समाज या दुर्गम भागाच्या विकासासाठी संघटित झाला आहे. येथील ग्रामपंचायतीचे पॅनेलप्रमुख आबा वेल्हाळ व बाजीप्रभू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजयसिह पाटील यांच्या नेतृत्वाखाली सात गावचे ग्रामस्थ एकत्र आले. या बैठकीत भाततळी, हरिीजनवस्ती, केंबुर्णेवाडी, दिवाणबाग, साईनाथपेठ, गजापूर, वाणीपेठ व विशाळगड येथील प्रत्येकी पाच तरुणांची समिती स्थापन करण्यात आली. प्रास्तविक माजी उपसरपंच शरद पाटील यांनी केले. यावेळी शिवाजी तरुण मंडळाचे प्रमुख बंडू भोसले, मंगेश पाटील, पानखिंडचे माजी सरपंच चंद्रकांत पाटील, बाजीप्रभू तरुण मंडळाचे अध्यक्ष नारायण पाटील, केंबुर्णेवाडीचे नारायण निवळे, सुधीर पाटील,संतोष रेडीज, आनंद कांबळे,सागर कांबळे, माणकू पाटील, पांडुरंग पवार, यांनी संघटनेवर मनोगत व्यक्त केले.यावेळी आबा वेल्हाळ म्हणाले, विशाळगडचा ऐतिहासिक बाज राखताना वाढती अतिक्रमणे, अस्वच्छता, रस्ते बांधणी, पाणी व्यवस्थापन याबाबात धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. होळी असेल किंवा शिवजयंती असेल येथील परंपरा जपणारे उत्सव एकोप्याने साजरे होतील, अशी अपेक्षा नारायण पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी जगदीश अंगडी, संतोष वेव्हाळ, मनोहर कांबळे, माजी सरपंच आत्माराम पाटील, महादेव पाटील, उपसरपंच संदीप निवळे, संतोष पाटील, सोनू कांबळे, योगेश भोसले, शांताराम धुमक, जनार्र्दन कोळापटे यांच्यासह सात गावांतील विविध मंडळांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुभाष पाटील यांनी आभार मानले.इतिहास पुसता येणार नाहीगडावरील प्राचीन मंदिराचे पावित्र्य व शिवकालीन समाध्या, शिवकालीन जलस्रोत यांची पुनर्बांधणी करण्यासाठी शिवप्रेमींचा दबाव गट प्रबळ करून शासन दरबारी आवाज उठवून गडाला गतवैभव मिळवून देण्यास स्थानिकांची एकी मोलाची ठरेल. गडावरील टापेचे पाणी व घोड्याच्या पागा येथे वेगळ्या नावाचे फलक लागले आहेत. गडावरील डिजिटल फलकावर काही समाजकंटक शाई मारून समाजात तेढ वाढवित आहेत, अशा विकृत मंडळींना धडा शिकविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शासकीय कर्मचाºयांना मारहाण होत असल्याने गडावरील शाळा बंद पडण्याची, तर पटसंख्येअभावी हायस्कूलच्या तुकडीवर परिणाम होऊ शकतो. चुकीच्या प्रवृत्तीला खतपाणी कुणी घालू नये, असा इशारा मंगेश पाटील यांनी दिला.