कोल्हापूर : चीनने केलेल्या हल्ल्यात २० जवान शहीद झाले. जागतिक पातळीवर भारताची मोठी नामुष्की झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने चीनबाबतची नेमकी भूमिका तसेच धोरण काय आहे, घडलेल्या प्रकाराबाबतचे नेमके सत्य काय आहे, हे एकदा जनतेला सांगावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केले.कसलेही कारण नसताना चीनने भारतावर हल्ला केला. भारतीय जवानांना मारले. त्याबाबत संरक्षणमंत्री राजनाथसिंह बोलायला तयार नाहीत. एवढे होऊनही चीनचा साधा उल्लेखही त्यांनी केलेला नाही. पंतप्रधान तर चीनने घुसखोरी केली नाही, असे सांगत आहेत. चीनची वृत्तपत्रे पंतप्रधानांचे कौतुक करू लागली आहेत. त्यामुळे जनता संभ्रमात आहे. म्हणूनच नेमके सत्य बाहेर आले पाहिजे. केंद्र सरकारची भूमिका, धोरण काय हे कळले पाहिजे, असे पालकमंत्री म्हणाले.गलवान परिसर, तेथील सरोवर आपल्या हद्दीत आहे की नाही, याचे स्पष्टीकरण झाले पाहिजे. केंद्र सरकारची भूमिका सतत बदलत आहे. केवळ दिशाभूल करून विषयांतर करायचे. शहिदांचा विषय बाजूला केला जात आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते.डोळे कोणी लाल केले?तुम्ही चीनला लाल डोळे दाखविणार होता. नेमके लाल डोळे तुम्ही दाखविले की तुम्हाला त्यांनी दाखविले हा जनतेला पडलेला प्रश्न आहे. म्हणूनच केंद्र सरकारचे धोरण खरे आहे की खोटे आहे, तेही कळायला पाहिजे, असे पालकमंत्री म्हणाले.असा दुर्दैवी पंतप्रधान झाला नाहीकेंद्र सरकारने चीनच्या सर्व उत्पादनांवर बहिष्कार घालावा. त्यांची कोणतीही वस्तू घेऊ नये, अशी मागणी आमदार पी. एन. पाटील यांनी केली. मोदी कोणतीच गोष्ट खरी बोलत नाहीत. केवळ दिशाभूल करीत आहेत. असा दुर्दैवी पंतप्रधान यापूर्वी कधीही झाला नाही, असे पाटील म्हणाले.
वीस जवान शहीद झाले तरीही धोरण अस्पष्ट : पालकमंत्री पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 5:49 PM
चीनने केलेल्या हल्ल्यात २० जवान शहीद झाले. जागतिक पातळीवर भारताची मोठी नामुष्की झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने चीनबाबतची नेमकी भूमिका तसेच धोरण काय आहे, घडलेल्या प्रकाराबाबतचे नेमके सत्य काय आहे, हे एकदा जनतेला सांगावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केले
ठळक मुद्देवीस जवान शहीद झाले तरीही धोरण अस्पष्ट : पालकमंत्री पाटीलअसा दुर्दैवी पंतप्रधान झाला नाही