शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
3
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
4
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
5
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
6
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
7
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
8
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
9
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
10
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने शरद पवार गटात नाराजी? इंदापूरच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार बदलण्याची केली मागणी
11
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
12
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
13
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
14
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
15
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
16
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
17
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
18
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा
19
Nobel Peace Prize 2024: अण्वस्त्रांविरोधात काम करणाऱ्या संस्थेचा नोबेल शांतता पारितोषिकाने सन्मान
20
Manu Bhaker चा फॅशन वीकमध्ये जलवा; ऑलिम्पिक मेडलिस्ट खेळाडूचा नवा अवतार

कोल्हापूर हद्दवाढ: ३२ वर्षे पाठपुरावा, तरीही शहर वाढेना; प्रस्तावांचा प्रदीर्घ प्रवास..वाचा सविस्तर

By भारत चव्हाण | Published: September 11, 2023 4:28 PM

गतिमान सरकारकडून अपेक्षा

भारत चव्हाणकोल्हापूर : गत बत्तीस वर्षांत शेकडो निवेदने दिली, अनेक वेळा आंदोलने झाली, असंख्य शिष्टमंडळे विविध सरकारातील मुख्यमंत्र्यांना भेटली, परिपूर्ण असे तब्बल पाच प्रस्ताव पाठविले, उच्च न्यायालयाने सहा महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश दिले, महापालिका प्रशासनाने तीन वेळा वस्तुस्थितीदर्शक अहवाल पाठविले तरीही कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा गुंता सुटलेला नाही. बत्तीस वर्षांत हद्दवाढीसारखा महत्त्वाचा प्रश्न सरकारला सोडविता येत नाही, हे राज्य सरकारचे अपयशच मानले पाहिजे.दरम्यान, रविवारी कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हात जोडतो, परंतु कोल्हापूरची हद्दवाढ करण्याचे आवाहन केले आहे. आता अजित पवार आपला शब्द किती पाळतात हेही कळणार आहे.राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या हद्दवाढी झाल्या, परंतु, कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ मात्र गेल्या सत्तर वर्षांत झालेली नाही. नवी मुंबई, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद यासारखी शहरे हद्दवाढीमुळे विकासाच्या बाबतीत पुढे गेली. कोल्हापूर शहर मात्र १९४८ पासून आहे तेवढेच राहिले आहे. जर वेळीच निर्णय घेतले गेले असते तर कोल्हापूरसुद्धा राज्यात एक आघाडीचे शहर बनले असते. शहराची हद्दवाढ नाही म्हणून विकास झाला नाही, असा ठपका बसला नसता.मुळात हद्दवाढीचा विषय हा राजकीय आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनीच तो एकत्र बसून सोडवायला पाहिजे होता. पण, प्रत्येक राजकारण्यांची भूमिका वेगवेगळी आहे. सर्वांनीच या प्रश्नाला बगल दिली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात हा प्रश्न सुटला नाही, तेव्हा भाजप-शिवसेना हद्दवाढीची मागणी करत राहिले. पण, हे पक्ष सत्तेत आल्यानंतरही त्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले नाही. उलट भाजपच्या मंत्र्यांनी तर हद्दवाढीच्या विषयाला बगल देत कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण मानगुटीवर बसविले.आता नवीन आलेल्या प्रशासक के. मंजूलक्ष्मी या विषयाचा अभ्यास करून शास्त्रीय सिद्धांतावर आधारित नव्याने सुधारित प्रस्ताव राज्य सरकारला पाठविणार आहेत. तसे त्यांनी कृती समितीला आश्वासन दिले आहे. पण, किती वेळा प्रस्ताव पाठवायचे हाही प्रश्नच आहे. राज्य सरकारकडे यापूर्वी पाच ते सहा प्रस्ताव पाठविले, सरकारने वेळोवेळी केलेल्या सूचनांनुसार प्रस्तावात बदल केले. आता निर्णय राज्य सरकारनेच घ्यायचा आहे.गतिमान सरकारकडून अपेक्षा‘गतिमान सरकार, निर्णय वेगवान’ अशी नवी ओळख दिलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२१ मध्ये प्रस्ताव मागितला होता. तो पाठवून दोन अडीच वर्षे होत आली तरीही त्यांच्याकडून निर्णय घेतला गेलेला नाही. जर निर्णयच घेणार नसतील तर प्रस्ताव मागवून तोंडाला पाने का पुसता, हाच खरा सवाल आहे.

प्रस्तावांचा असा झाला प्रदीर्घ प्रवास१) मूळ प्रस्ताव तत्कालीन महासभा ठराव क्र. ६५९ दि.२४/०७/१९९० अन्वये ४२ गावांचा समावेश करून दि. २४/०७/१९९० रोजीने शासनास सादर केला. यास अनुसरून शासनाने दि. २०/०४/१९९२ रोजी हद्दवाढीबाबतची प्राथमिक अधिसूचना निर्गमित.२) शासनाचे दि. ११/०७/२००१ चे पत्रान्वये सुधारित हद्दवाढ प्रस्ताव सादर करण्याची सूचना. त्यानुसार दि. १८/०३/२००२ रोजी मूळ प्रस्तावातील २५ गावे वगळून उर्वरित १५ गावे व २ एमआयडीसीसह एकूण १७ गावांचा सुधारित हद्दवाढ प्रस्ताव महासभा ठराव क्र. ६० दि. २४/०१/२००२ मंजुरीने शासनास सादर.३) पुन्हा २५ गावे वगळून १७ गावांचा सुधारित हद्दवाढ प्रस्ताव महासभा ठराव क्र. २७२ दि.१४/०९/२०१२ ची मान्यता होऊन शासनास दि. ८/११/२०१२ रोजी सादर.४) हद्दवाढीसंदर्भाने उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेली जनहित याचिका क्र. ७० / २०१३ मध्ये महानगरपालिकेतर्फे दि. ३१/०१/२०१४ पर्यंत हद्दवाढीचा प्रस्ताव शासनास सादर करण्याबाबत व शासनाने सहा महिन्यांच्या आत निर्णय घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला. कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे मूळ प्रस्तावातील एकूण ४२ गावांपैकी १७ गावांचा समावेश करून परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे दि. १०/०७/२०१३ सादर.५) महानगरपालिका हद्दीपासून १ ते २ किलोमीटर हद्दीतील गावे ज्यांचा नागरीकरणांचा वेग चांगला आहे, अशी निवडक १८ गावे व २ एमआयडीसी यांचा समावेश करून महासभा ठराव क्र. २६६ दि. २१/०६/२०१५ रोजीचे मान्यतेने दि. २२/०६/२०१५ रोजी शासनास सादर.६) महानगरपालिकेकडे हद्दवाढीच्या अनुषंगाने प्राप्त निवेदनांचा अहवाल शासनास दि. २६/०२/२०२१ दि. ०२/०२/२०२२ व दि. २३/०२/२०२३ अन्वये सादर.

१८ गावे, दोन औद्योगिक वसाहतीमहानगरपालिकेने २२ जून २०१५ रोजी शासनास सादर केलेला प्रस्ताव कायम असून त्यात १) शिये २) वडणगे ३) आंबेवाडी ४) सरनोबतवाडी ५) उजळाईवाडी ६) नागदेववाडी ७) नवेबालिंगे ८) वाडीपीर ९) मोरेवाडी, १०) पाचगाव ११) कळंबे तर्फे ठाणे, १२) शिरोली १३) उचगाव १४) शिंगणापूर १५) गोकूळ शिरगाव १६) नांगाव १७) वळीवडे-गांधीनगर १८) मुडशिंगी आणि शिरोली व गोकूळ शिरगाव एमआयडीसीचा समावेश. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर