शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
3
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
4
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
5
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
6
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
7
"मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी?", नाना पटोलेंचा निवडणूक आयोगाला सवाल
8
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
9
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
10
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
11
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
12
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
13
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
14
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी
15
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
16
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
17
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
18
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
19
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
20
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी

संविधानापूर्वीच त्याची मूल्ये शाहूंनी संस्थानात रुजवली;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:21 AM

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांनी संविधान अस्तित्वात येण्यापूर्वीच संविधानाच्या प्रास्ताविकेमधील स्वातंत्र्य, समता, बंधुता, सहिष्णुता, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांनी संविधान अस्तित्वात येण्यापूर्वीच संविधानाच्या प्रास्ताविकेमधील स्वातंत्र्य, समता, बंधुता, सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांची कसोशीने अंमलबजावणी केली. शिक्षणाचा हक्क, आंतरजातीय विवाह, सक्तीचे मोफत शिक्षण, वेदोक्त प्रकरणानंतरची पुरोगामी चळवळ, त्यादृष्टीने संस्थानात लागू केलेले कायदे यातून संविधानिक मूल्ये रुजवली व त्या दिशेने कृतिशील पावले उचलली. संविधानाची संस्थानात रुजवात करणारे ते एकमेव पूर्वसुरी होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्रातर्फे ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार संपादित ‘राजर्षी शाहू छत्रपती आणि कोल्हापूर (खंड-१२)’ आणि ‘शाहू छत्रपती : राजा आणि क्रांतिकारक (खंड-१३)’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन त्यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. शिवाजी विद्यापीठाच्या छत्रपती शाहू स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत मद्रास विद्यापीठाचे डॉ. चंद्रा मुदलियार आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. एन. वैद्य यांनी दिलेल्या व्याख्यानांचा प्रा. दिलीप पंगू आणि चंद्रकांत गायकवाड यांनी अनुवाद केला.

डॉ. देशमुख म्हणाले, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी वि. रा. शिंदे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांनी महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशाला पुरोगामित्वाची दिशा दाखविली. त्यांना केवळ राज्यापुरते संकुचित करून चालणार नाही. जिथे जिथे वंचित, शोषितांची चळवळ सुरू आहे, तिथे तिथे या महापुरूषांचे अस्तित्व आहे. वर्तमानात महापुरुषांचे दैवतीकरण आणि विकृतीकरण सुरू आहे. दोन्ही बाबी प्रत्येकजण आपापल्या अजेंड्यानुसार करत असून हे गैर आहे.

ते म्हणाले, न्या. वैद्यांनी शाहू महाराजांचे चरित्र रंजकपणे मात्र अत्यंत नेमकेपणाने व नेटकेपणाने सांगितले आहे. महाराजांचे थोरपण श्रोत्यांवर बिंबविण्यात ते यशस्वी झाले आहेत. चंद्रा मुदलियार यांनी कोल्हापुरातील ब्राम्हणेतर चळवळीचा साद्यंत वेध घेतला आहे. चिकित्सक मांडणीतून त्यांनी इतिहास संशोधनाचा वस्तुनिष्ठ नमुना सादर केला आहे.

डॉ. जयसिंगराव पवार प्रास्ताविकात म्हणाले, शाहू महाराजांनी शैक्षणिक व सामाजिक सुधारणांची चळवळ सुुरू केली, तेव्हा ब्राम्हणांना आपल्या प्रतिष्ठेला बाधा आल्यासारखे वाटले. वेदोक्त प्रकरणामुळे या भावनेला टोकाचे स्वरूप येऊन ब्राम्हणेतर चळवळ अधिक गतिमान झाली. अशा अनेक घटना आहेत, की त्यांचे खूप संशोधन होऊ शकते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, उत्तम प्रशासन चालवायचे असेल, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या चरित्रांचा आजच्या तरुणांनी अभ्यास केला पाहिजे. शाहूंचे चरित्र प्रकाशात आणण्यासाठी केंद्रातर्फे प्रयत्न केले जातील. त्यांनी स्त्रियांसाठी केलेल्या कार्याविषयी केंद्रामार्फत लवकरच प्रकल्प हाती घेण्यात येईल.

डॉ. देविकाराणी पाटील यांनी सूत्रसंचालन केले, सचिन घोरपडे यांनी संयोजन केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले.

---

शाहूंचे विविध पैलू प्रकाशात यावेत..

यावेळी मान्यवरांनी, शाहू महाराजांनी वेगवेगळ्या घटकांसाठी केलेले कार्य प्रकाशात येण्याची गरज आहे. महाराजांचे स्त्री-पुरुष समानतेचे काम, त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी दिलेली साथ, सर फ्रेझर व महाराज यांचे संबंध, राधानगरी धरण बांधतानाची त्यांची तळमळ, राजकीय चळवळीसाठी महाराजांचे कार्य... अशा विविध पैलूंवर शाहू संशोधन केंद्राचे काम करावे, असे आवाहन केले.

यावर कुलगुरू डॉ. शिर्के यांनी, या विषयावर संशोधन करून ते पुस्तकरूपाने प्रकाशात आणले जाईल, अशी ग्वाही दिली.

---

फोटो नं ०६०३२०२१-कोल-शाहू संशोधन बुक

ओळ :

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात शनिवारी ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार संपादित दोन पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्याहस्ते झाले. यावेळी प्रा. चंद्रकांत गायकवाड, दिलीप पंगू, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, डॉ. पवार, डॉ. व्ही. एन. शिंदे उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)

--