लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : यशवंत सहकारी बँकेने चालू आर्थिक वर्षात ठेवी संकलन, कर्जे वाटप व वसुलीत मागील पाच वर्षातील उच्चांक नोंदवला असून बँकेला निव्वळ नफा १ कोटी २१ लाख ५२ हजार झाला आहे. आण्णासाहेब महामंडळाच्या माध्यमातून १०० तरुण उद्योजक निर्माण केले असून यातील कर्ज परतावाही १०० टक्के असल्याचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी सांगितले.
कुडित्रे (ता. करवीर) येथील बँकेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या पत्रकार बैठकीत एकनाथ पाटील बोलत होते. उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पाटील म्हणाले बँकेने चालू आर्थिक वर्षात २०५ कोटी ९ लाखांचा व्यवसाय केला असून ही वाढ १८ टक्के आहे. सभासद, कर्जदार व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून बँकेने ७८ कोटी ७६ लाख ७३ हजार रुपयांची कर्जे वाटली आहेत कर्ज प्रकरणांत ११ कोटींची वाढ झाली आहे. बँकेकडे आज १२५ कोटी ३२ लाख ६२ हजारांच्या ठेवी आहेत. यावर्षी त्यात १९ कोटींनी वाढ झाली आहे. बँकेला आर्थिक वर्षात २ कोटी २३ लाखाचा ढोबळ नफा झाला असून निव्वळ नफा १ कोटी २१ लाख ५२ हजार झाला आहे खेळत्या भांडवलात १४ टक्के वाढ झाली असून ते १५० कोटी २५ लाख ७० हजार एवढे झाले आहे असे सांगितले. यावेळी संचालक आनंदराव पाटील, सुभाष पाटील, एस. के. पाटील, प्रकाश पाटील, निवास पाटील, सर्जेराव पाटील, दादासोा पाटील, सर्जेराव पाटील, संग्राम भापकर, उत्तम पाटील, भगवान सूर्यवंशी सीईओ भाऊसाहेब कांबळे उपस्थित होते.
फोटो --एकनाथ पाटील अध्यक्ष यशवंत बँक कुडित्रे