शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

सोनेरी कामगिरी करूनही ‘जयश्री’ मानसन्मानासह पदोन्नतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 2:06 PM

अमेरिकेतील लॉस एंजिल्स येथे मागील महिन्यात झालेल्या विश्व पोलीस- फायर क्रीडा स्पर्धेत चार सुवर्णांसह दोन रौप्य व एक कांस्य व मागील स्पर्धेतही तीन सुवर्णपदकांची कमाई करणाºया कोल्हापूर पोलीस दलाची आंतरराष्ट्रीय धावपटू जयश्री बोरगी हिला दलासह राज्य शासनाकडून मानसन्मान व पदोन्नतीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

ठळक मुद्देजयश्री बोरगी कोल्हापूर पोलीस दलाची आंतरराष्ट्रीय धावपटू व्हर्जिनिया येथे झालेल्या विश्व पोलीस-फायर क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्णरहमान यार्चा विक्रम मागे टाकत नवा विक्रम

सचिन भोसले

कोल्हापूर : अमेरिकेतील लॉस एंजिल्स येथे मागील महिन्यात झालेल्या विश्व पोलीस- फायर क्रीडा स्पर्धेत चार सुवर्णांसह दोन रौप्य व एक कांस्य व मागील स्पर्धेतही तीन सुवर्णपदकांची कमाई करणाºया कोल्हापूर पोलीस दलाची आंतरराष्ट्रीय धावपटू जयश्री बोरगी हिला दलासह राज्य शासनाकडून मानसन्मान व पदोन्नतीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

जयश्री हिने डिसेंबर २०१५ मध्ये अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे झालेल्या विश्व पोलीस-फायर क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्णपदके पटकाविण्याची कामगिरी केली. यात तिने ३००० मीटर स्टीपल चेस प्रकारात पोलंडच्या वोजोटूवूच्च अ?ॅना हिला मागे टाकत प्रथम क्रमांक पटकाविला. यात तिने यापूवीर्चा भारतीय पोलीस दलातील धावपटू डब्ल्यू. रहमान याने ११:३१:२९ एम इतका नोंदविलेला विक्रम मागे टाकत ११:०३:२१ एम इतकी वेळ नोंदवत नवा विक्रम नोंदवला.

अशी कामगिरी करणारी ती महाराष्ट्र पोलीस दलातील एकमेव महिला कर्मचारी ठरली होती. यासह तिने या स्पर्धेत १००० मीटर व ५००० मीटर स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होत; तर नुकत्याच मागील महिन्यात अमेरिकेतील लॉस एंजिल्स येथे झालेल्या विश्व पोलीस-फायर क्रीडा स्पर्धेतही जयश्रीने पाच किलोमीटर चालणे, १०००० मीटर धावणे, ३००० व १५०० मीटर स्टीपल चेस यासह अन्य धावणे प्रकारात चार सुवर्ण, दोन रौप्य व एक कांस्यपदकाची कमाई केली.

यापूर्वी चीन येथे झालेल्या विश्व विद्यापीठ स्पर्धेत तिने भारतातर्फे सहभाग घेत उज्ज्वल कामगिरी केली होती. तिने केलेली कामगिरी देशासाठी होती. त्यामुळे तिच्या कामगिरीची दखल राज्य शासनाच्या गृह विभागाने घेणे गरजेचे होते; कारण राज्यातील कुस्तीगीरांनी जर तीन वेळा महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला, तर त्याला थेट पोलीस उपअधीक्षक पद मिळते; तर दलातीलच कर्मचारी असणाºया जयश्रीला आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या दोन स्पर्धांमध्ये सुवर्णमयी कामगिरी करूनही पदरी उपेक्षाच पडली आहे. विशेष म्हणजे दलाचा सर्वोच्च मान असणारे पोलीस महासंचालक यांचे पदकही तिला अद्याप मिळालेले नाही. यासह शिवछत्रपती पुरस्कारासाठीही ती दावेदार आहे.

जयश्री ची कामगिरी अशी

- २००७ साली धारवाड येथे झालेल्या राष्ट्रीय कनिष्ठ अ?ॅथलेटिक्स स्पर्धेत ३००० मीटर धावणेमध्ये रौप्य.- २००८ साली पश्चिम बंगाल येथे झालेल्या ५३ व्या शालेय स्कूल गेम्समध्ये क्रॉस कंट्रीमध्ये सुवर्णपदक.- २००९ साली आंध्रप्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय कनिष्ठ धावणे स्पर्धेत ५००० मीटरमध्ये रौप्यपदक.- २००९ साली चंदीगढ येथे झालेल्या २१ व्या पश्चिम विभागीय राष्ट्रीय स्पर्धेत ३००० व ५००० मीटरमध्ये सुवर्णपदक.- २००९ साली जबलपूर येथे झालेल्या पश्चिम विभागीय राष्ट्रीय अ?ॅथलेटिक्स स्पर्धेत ३००० व ५००० मीटरमध्ये सुवर्णपदक.- २०१० साली झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत ५००० मीटर धावणे मध्ये सुवर्णपदक.- २०१०-११ साली चीन येथे झालेल्या विश्व विद्यापीठ स्पर्धेत सहभाग.- २०११ च्या स्टँडर्ड चार्टर्ड मॅरेथान स्पर्धेत सुवर्णपदक.- २०१३ व १४ साली झाशी येथे झालेल्या राष्ट्रीय खुल्या क्रॉस कंट्री स्पर्धेत ८ किलोमीटर धावणेमध्ये रौप्य.- २०१३ साली बिहार येथे झालेल्या राष्ट्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत स्टीपल चेसमध्ये कांस्यपदक- २०१४-१५ साली गोवा येथे झालेल्या लुसिफोनिया गेम्समध्ये ५००० मीटर धावणेमध्ये सुवर्णपदक.- २०१४ साली हरियाणा येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस ५ कि.मी स्पर्धेत सुवर्णपदक.२०१५ साली केरळ येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदक.२०१५ साली केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ५ कि .मी स्टीपल चेसमध्ये कांस्यपदक.२०१५ साली अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे झालेल्या विश्व पोलीस-फायर गेम्समध्ये ५००० मीटर धावणे, १५०० व ३००० स्टीपल चेसमध्ये तीन सुवर्ण, ५ कि.मी. चालणे स्पर्धेत रौप्यपदक असे तीन सुवर्ण, एका रौप्यपदकाची कमाई केली.२०१७ साली अमेरिकेतील लॉस एंजिल्स येथे झालेल्या विश्व पोलीस-फायर गेम्समध्ये १५०० मीटर ३,५व १०कि.मी.धावणे व ५कि मी चालणे या पाचहि प्रकारात पाच सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.