कोल्हापूर : कोरोना संसर्ग अद्याप सुरू असला तरीही कोल्हापूर शहरात विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. मंगळवारी एका दिवसात विनामास्क फिरणाऱ्या ४२४ नागरिकांना महापालिकेच्या पथकांनी दंड केला. त्यांच्याकडून २ लाख १२ हजार व फिजिकल डिस्टन्स न ठेवणाऱ्या १४ नागरिकांकडून १४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मंगळवारी महापालिकेच्या सहा भरारी पथकांमार्फत शहरात कारवाई करून ४३८ नागरिकांकडून २ लाख २६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोल्हापूर शहरात गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्ग सुरू आहे. रोज चारशेच्या आसपास नवीन रुग्ण आढळून येत आहेत. तरीही त्याचे गांभिर्य शहरवासीयांना नाही. महापालिकेची पथके रोज शहरातील प्रमुख रस्त्यावर फिरत आहेत, त्याचीही भीती राहिलेली नाही, याचेच आश्चर्य वाटते.
मंगळवारची कारवाई शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, लक्ष्मीपुरी परिसर, गंगावेश, रंकाळावेश, उतरेश्वर, लक्षतीर्थ वसाहत, महाद्वार रोड, शिवाजी पेठ, फुलेवाडी, नाना पाटीलनगर, जरगनगर, रायगड कॉलनी, सानेगुरुजी वसाहत, साळोखेनगर, संभाजीनगर, खासबाग, जवाहरनगर, उद्दयमनगर, प्रतिभानगर, शाहुनगर, राजारामपुरी, शाहुपुरी, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, राजेंद्रनगर, सायबर चौक, मार्कट यार्ड, रुईकर कॉलनी, कदमवाडी, सदर बाजार, कसबा बावडा, लाईन बाजार, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, एसटी स्टॅण्ड परिसर, रेल्वे स्टेशन परिसरात करण्यात आली.