कोल्हापूर : जिल्हा प्रशासनाने सात दिवस केलेला लॉकडाऊन आज, सोमवारपासून शिथिल झाला आहे. मात्र कोरोना रुग्णांमुळे शहरातील १०० पेक्षा जास्त परिसर सील आहेत. त्यामुळे बहुतांश परिसर आणखी काही दिवस लॉक राहणार आहे. शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण दररोज मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाला परिसर सील करावे लागत आहेत. शहरात आतापर्यंत हजारांवर रुग्ण झाले आहेत. परिणामी १०० पेक्षा जास्त परिसर बॅरिकेड्स, बांबू लावून सील केले आहेत. महापालिकेचे काही अखंड प्रभाग सील झाला आहे.यामुळे शहरातील प्रमुख रस्तेही बंद आहेत. प्रतिबंधित क्षेत्रांतील दुकाने काही अंशी बंद आहेत. अशा परिस्थितीत आज, सोमवारपासून प्रशासनाने लॉकडाऊन जरी शिथिल केला असला तरी फारसा फरक पडेल असे चिन्ह नाही. मिळेल त्या साहित्याने प्रभाग सीलकोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने अनेक गल्ल्या सील झाल्या आहेत. महापालिकेकडे बॅरिकेड्स कमी पडत असल्याने मिळेल ते साहित्याने प्रभाग सील केले जात आहेत. बाजारगेट प्रभागात लोणार गल्ली येथे तर बसायची बाकडी आडवी टाकून रस्ता बंद केला आहे.
अनलॉक केले तरी शहर राहणार लॉक, १०० पेक्षा जास्त प्रभाग सीलचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:37 PM
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने सात दिवस केलेला लॉकडाऊन आज, सोमवारपासून शिथिल झाला आहे. मात्र कोरोना रुग्णांमुळे शहरातील १०० पेक्षा जास्त परिसर सील आहेत. त्यामुळे बहुतांश परिसर आणखी काही दिवस लॉक राहणार आहे.
ठळक मुद्देअनलॉक केले तरी शहर राहणार लॉक, १०० पेक्षा जास्त प्रभाग सीलचा परिणामकोरोनाचा फटका- शहरात ये-जा करणे झाले अवघड