सेनापती कापशी : मंत्रिपदाची हवा मी कधीही डोक्यात शिरू दिली नाही. मी मंत्री असलो तरी गोरगरीब जनतेचा हमाल आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करीत राहीन, असेही ते म्हणाले.
करंजीवने (ता. कागल) येथे विवीध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम. एस. पवार होते. विरोधकांवर टीकाटिप्पणी करण्यापेक्षा व केलेल्या टीकेला उत्तर न देता फक्त विकासकामाचे ध्येय गाठणार आहे. विधवासंबंधातील सर्वच जुनाट कुप्रथा मोडीत काढा, तसेच प्रत्येक गावात विधवा माता-भगिनींचा सन्मान करा, असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.यावेळी शशिकांत खोत म्हणाले, माणसातला खरा देव म्हणजे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ होय. उत्तम टेंबुगडे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत युवराज लाड यानी केले. प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य संजय आंग्रे यांनी केले. आभार एम. एस. पोवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी सरपंच दगडू शेटके, अन्नपूर्णा शुगरचे संचालक राजेश भराडे, उपसरपंच सौ. वंदना पोवार, सुधीर मासवेकर, बाबूराव शेटके, बाळासो तुरंबे, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.