शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

Kolhapur: पीकविमा ठरतोय मृगजळ; गतवर्षीची नुकसानभरपाईही हवेत अन् यंदा पंचनाम्यांना मुहूर्त सापडेना  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 3:49 PM

भरपाई मिळणार तरी कधी?, शेतकरी हवालदिल

दत्तात्रय पाटीलम्हाकवे : रुपयात पीकविमा उतरवला; पण पूर ओसरून दहा दिवस उलटले तरीही पूरबाधित पिकांचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी फिरकलेच नाहीत. त्यामुळे पूरबाधित शेतकऱ्यांसह अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले शेतकरी विवंचनेत सापडलेले आहेत. विमा कंपन्यांकडून पंचनामे कधी होणार असा सवाल उपस्थित होत आहे, तर वर्षे उलटले तरीही अद्याप गतवर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरवून पीक संरक्षित करावे. यासाठी गत वर्षांपासून शासनाने एक रुपयात पीकविमा योजना लागू केली. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीकविमा उतरवला. परंतु, गेल्यावर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही भरपाईची रक्कम मिळालेली नाही.यंदा तर कागल तालुक्यातील वेदगंगा व दुधगंगा नदीकाठावरील शेकडो एकरातील उसासह भात, सोयाबीन, भुईमूग पिके कुजून गेली आहेत. यंदा तब्बल १८ दिवसांहून अधिक काळ पिके पाण्याखाली राहिली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

दरम्यान, दहा-पंधरा दिवसांनंतर पूरबाधित पिके पुन्हा थोडी फार हिरवी दिसू शकतील, मात्र पुरामुळे ते अशक्त झाल्याने उत्पादकता कमी होणार आहे.भरपाई मिळणार तरी कधी?२०२३ खरीप हंगामात रामचंद्र दत्तू गोते (आनूर क्षेत्र अंदाजे ६० गुंठे), सुभाष भाऊ चौगुले (आनूर क्षेत्र अंदाजे ८४ गुंठे),लक्ष्मीबाई बाळाराम पाटील (म्हाकवे ३० गुंठे) यांनी गतवर्षी पीकविमा उतरवला होता; परंतु, नुकसान होऊनही भरपाई मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

कागलमधील चार टक्केच शेतकरीच पात्र

गत २०२३ खरीप हंगामात कागलमधील १५७० शेतकऱ्यांनी २८९९ विमा अर्ज दाखल केल्याने ९१३ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले होते. मात्र, केवळ ६० म्हणजे अवघ्या चार टक्के शेतकऱ्यांनाच पीकविमा परतावा मंजूर झाला आहे. अद्याप या शेतकऱ्यांच्या हातात भरपाईची रक्कम आलेली नाहीच तर उर्वरित शेतकरी भरपाईसाठी पात्र होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.विमा प्रतिनिधी आहेत तरी कुठे?यंदाच्या २०२४ खरीप हंगामात २१७० शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी ५०४५ अर्ज दाखल करून एक हजार ३१५ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले आहे, तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष ८-१० दिवसापूंर्वीच शेतावर जाऊन नुकसानीची ऑनलाइन तक्रार दाखल केली. मात्र, विमा प्रतिनिधी पंचनाम्यासाठी अद्यापही फिरकलेलाच नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी